लंडन : टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला फार कमाल दाखवता आली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीतील असमाधानकारक प्रदर्शनानंतर मैदानाच्या बाहेरुनही त्याच्यासाठी वाईट बातमी आहे.

ब्रॉडची गर्लफ्रेंड आणि प्रसिद्ध गायक मॉली किंगने स्टुअर्टसोबतचं नातं संपवलं आहे. काही वृत्तांनुसार, या 30 वर्षीय सेलिब्रिटीने सततच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ब्रेकअपचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही, तर दोघांनी सोशल मीडियावरही एकमेकांना अनफॉलो केलं आहे.

ब्रिटिश टॅबलॉईडच्या सूत्रांच्या माहितीनुसार, मॉली आणि स्टुअर्ट यांच्यातला रोमान्स आता संपला आहे. दोघांचंही वेळापत्रक अत्यंत व्यस्त असल्याने त्यांना एकमेकांना वेळ देणंही कठीण झालं आहे. त्यामुळे मॉली आणि स्टुअर्टने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

या रिलेशनशीपपूर्वी मॉली स्टुअर्टची फक्त मैत्रीण होती. सुरुवातीला दोघे काही डेट्सवर गेले, ते दिवस अत्यंत चांगले होते, असं मॉली म्हणाली होती. स्टुअर्ट अत्यंत प्रेमळ माणूस आहे. आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. आम्ही कशा प्रकारे एकमेकांना भेटलो, हे माहित नाही. मात्र खुप सहजपणे त्याच्या प्रेमात पडले, असंही मॉली काही दिवसांपूर्वी म्हणाली होती.



सोबतच मॉलीने स्वतःबाबत सांगितलं होतं, की ''मी करिअर आणि प्रेमाचे निर्णय डोक्यापेक्षा मनाचा आधार घेऊन घेतले आहेत, जे कधी कधी चांगलं नसतं,'' असं म्हणत तिने काही निर्णय चुकत असतात, असे संकेत दिले होते.

स्टुअर्ट ब्रॉडला भेटण्यापूर्वी मॉली मॉडल डेव्हिड गँडीसोबत रिलेशनशीपमध्ये होती. तर मॉलीला भेटण्यापूर्वी स्टुअर्ट ब्रॉड मॉडल बिली मिचेलसोबत रिलेशनशीपमध्ये होता.

युवराज सिंहने 2007 च्या विश्वचषकात ज्याच्या गोलंदाजीवर सलग सहा षटकार ठोकले होते, तो गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच होता. त्यामुळे स्टुअर्ट ब्रॉड भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात कायम असेल.