शारजा: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसनं थेट वेस्टइंडिजचा फलंदाज पोलार्डवर हल्लाबोल केला आहे. पाकविरुद्ध होणाऱ्या अंतिम वनडे सामन्यात पोलार्डला आराम द्यावा. असं त्याचं मत आहे.
न्यूज एजन्सी सीएमसीच्या मते, वकार म्हणाला की, 'रविवारी शारजामध्ये झालेल्या सामन्यात 338 धावांचा पाठलाग करताना विस्फोटक फलंदाज पोलार्डनं अजिबात मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला नाही.'
या सामन्यात पोलार्ड 38व्या षटकात फलंदाजीसाठी आला. त्यावेळी वेस्ट इंडिजचा स्कोअर 194 आणि 4 विकेट असा होता. त्यावेळी संघाला 12 रन प्रति ओव्हर हवे होते. पण पोलार्डनं मोठे फटके मारले नाहीत. त्यामुळे वेस्टइंडिजला 59 धावांनी पराभव स्वीकारावा लागला असं वकारचं म्हणणं आहे.
वकार म्हणाला की, 'त्याचा फलंदाजीचा अंदाज हा संघाचा आत्मविश्वास ढासळवणारा होता.'
'जवळजवळ तो त्या सामन्यात नव्हताच असं वाटत होतं. त्यानं मधल्या फळीतीला फलंदाजाप्रमाणे आपली भूमिकाच बजावली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, त्याला आराम द्यायला हवा.'
वेस्टइंडिजनं पाकविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिकाही 0-3 ने गमावली आहे. तर वनडे मालिकेतही ते 0-2ने मागे आहेत.