मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांच्या ई-चलान या ड्रीम प्रोजेक्टला अखेर सुरुवात झाली आहे. या प्रोजेक्टमुळे पोलिसांवरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची आशा आहे.


मुंबई शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्ही नजर ठेवणार आहे. त्यामुळे आता ट्रॅफिक विभागातूनही वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर नजर ठेवणं शक्य होणार आहे. अवघ्या काही मिनिटांतच नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई होईल.

नियम मोडल्यानंतर काहीच मिनिटांत चालकाला त्याच्या मोबाईलवर नियम तोडल्याची पावती पाठवली जाणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचारालाही आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.