Shocking : दिग्गज क्रिकेटपटूंच्या टीममधून विराट आउट
मॉर्गनने आपल्य टीममधील सलामीचा फलंदाज म्हणून त्याचा सहकारी एलिल्टेअर कुक याला पसंती दिली आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसला यालाही सलामीवीर म्हणून सहभागी केले आहे. याशिवाय मॉर्गनने आपल्या टीममध्ये रिकी पॉटींग, ब्रायन लारा, एबी डिविलियर्स, कुमार संगाकारा, विकेट किपिंगसाठी एमएस धोनी, अनिल कुंबळे, जेम्स अॅन्डरसन, डेल स्टेन आणि मिचेल जॉनसन यांची निवड केली आहे.
तर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रॅन्डन मेककुलमने आपल्या ड्रिम टीममधून विराट कोहली, एबी डिविलियर्स आणि आस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांना टीममधून वगळले आहे.
इंग्लंडचा कर्णधार आयॉन मॉर्गनने आपल्या ११ जणांच्या ड्रिम टीममध्ये भारतीय क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विराट कोहलीसारख्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंना वगळल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.
इंग्लंडचा एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार आयॉन मॉर्गन आणि न्यूझीलंचा माजी कर्णधार ब्रॅन्डन मेककुलमने जेव्ह आपली ११ जणांची ड्रिम टीम जाहीर केली या टीममध्ये विद्यमान अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उत्तम क्रिकेटपटूंना वगळण्यात आल्याने अनेकजण अश्चर्यचकित झाले आहेत.
मेककुलमने आपल्या टीमचा कर्णधार म्हणून सर विव रिचर्डस यांची निवड केली आहे.
तर मेककुलमने आपल्या टीममध्ये सचिन तेंडूलकर आणि ख्रिस गेल यांना सलामीचा फलंदाज म्हणून सहभागी केले आहे. तिसऱ्या क्रमांकावर रिकी पॉटींग, चौथ्या स्थानी ब्रायन लारा, पाचव्या स्थानी विव रिचर्डस, जॅक कॅलिस, एडम गिलक्रिस्ट आदींची निवड केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी आपली ड्रिम टीम लाँच केली आहे. पण या ड्रिम टीममधून अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा पत्ता कट करण्यात आला आहे.