...म्हणून जुलैमध्ये 11 दिवस बँका बंद राहणार!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजुलै महिन्याच्या सुट्ट्यांची सुरुवात 3 जुलै रविवारपासून होणार आहे. यानंतर 6 जुलैला रमजान ईदची सुट्टी आहे. तर 9 जुलैला दुसरा शनिवार आणि 10 जुलैला रविवारची सुट्टी. 12 आणि 13 जुलैला बँकांचे संप आणि 17, 24 आणि 31 जुलैला रविवार आहे. तर 23 जुलैला चौथा शनिवार आहे. त्यामुळे बँका या दिवशी बंद राहतील.
बँका यूनियननुसार, 12 आणि 13 जुलैला स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ बीकानेर-जयपूर आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन कर्मचारी संपावर जाणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या बँकेंचं विलीनीकरण यामुळे हा संप पुकारण्यात येणार आहे. त्याशिवाय सरकारी सुट्टी आणि सण मिळून एकूण 11 सुट्ट्या असणार आहेत.
जुलै महिन्यात बँका बंद राहण्याची कारणं म्हणजे, सरकारी सुट्ट्या, सण आणि कर्मचाऱ्यांचा संप आहे. बँका बंद राहणार असल्यानं तुमची महत्वाची कामं अडू शकतात.
बँकेत जर आपलं काही महत्त्वाचं काम असेल तर जून महिन्यातच ते आटोपून घ्या कारण की, जुलै महिन्यात बँका तब्बल 11 दिवस बंद राहणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -