आगरतळा: भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचं रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक थोडक्यात हुकलं. पण दीपाचे वडील दुलाल कर्माकर तिच्या पाठीशी आजही ठामपणे उभे आहेत. दीपा 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा चांगली कामगिरी करुन नक्कीच पदक पटकावेल असा त्यांना विश्वास आहे.


 

दुलाल कर्माकर म्हणाले की, 'तिनं केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे. मी अजिबात दुखी नाही. ही तिची पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. पुढच्या वेळेस जेव्हा जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होईल त्यावेळी ती यापेक्षा चांगली कामगिरी करेल आणि देशासाठी नक्कीच पदक घेऊन येईल.'

 

'दीपानं आपल्या कामगिरीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पुढच्या ऑलिम्पिकसाठी अजून चार वर्ष बाकी आहे. त्यामुळे ती यासाठी कठोर मेहनत करेल. ती आता फक्त त्रिपुराची मुलगी राहिलेली नाही. ती संपूर्ण देशाची मुलगी झाली आहे.' असंही तिचे वडील म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

 

जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचं कांस्यपदक हुकलं, चौथ्या स्थानावर