मुंबई : भारताची अव्वल जिम्नॅस्ट दिपा कर्माकरला आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक फेडरेशननं वर्ल्ड क्लास जिम्नॅस्टचा दर्जा दिला आहे. हा बहुमान मिळवणारी दिपा पहिलीच भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे.


 
जागतिक स्पर्धा, ऑलिम्पिक आणि वर्ल्ड गेम्सची अंतिम फेरी गाठणाऱ्या जिम्नॅस्ट्सना हा बहुमान दिला जातो. दिपानं गेल्या वर्षी ग्लास्गोमध्ये झालेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेत पाचवं स्थान मिळवलं होतं. त्याच कामगिरीमुळे दिपाची या बहुमानासाठी निवड झाली आहे.

 
रशिया, अमेरिका, जपान, चीनच्या जिम्नॅस्ट्ससाठी ही सामान्य बाब असली तरी मुंबईकर दिपा ही एकमेव भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे.