रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर 15 ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख होती. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मिडीयावर शुभेच्छांचा पाऊस पडला.

मात्र आता निवृत्तीनंतर धोनी काय करणार? हा सवाल सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे. याबाबत एबीपी न्यूजला एक्स्क्लुझिव्ह माहिती मिळाली आहे. धोनी निवृत्तीनंतर कृषी जगतात पाऊल ठेवण्याची शक्यता आहे. तो खताचा जागतिक ब्रॅण्ड बाजारात आणण्याचे संकेत आहे. तसेच प्रतिभावान खेळाडू तयार करण्याचाही त्याचा संकल्प आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर साक्षी भावूक, म्हणते...

माहितीनुसार काही दिवसांआधी धोनी आपल्या फार्म हाऊसवर ट्रॅक्टर चालवताना आणि शेती करताना दिसला होता. या कामात तो पुढं जाण्याची शक्यता आहे. धोनी आयपीएलची तयारी आणि टूर्नामेंटसाठी वर्षातील 3 महीने क्रिकेट खेळेल तर उर्वरीत काळात तो शेती करु शकतो.

महेंद्रसिंह धोनी नियो ग्लोबल फर्टिलायझर नावाचा एक ब्रँड बाजारात आणत आहे. यासाठी काही राज्य सरकारांशी देखील त्याची चर्चा झाली आहे. या ब्रँडला गावागावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची त्याची योजना आहे.

MS Dhoni | 'या' तीन क्षणांनी महेंद्र सिंह धोनीला भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवून दिलं 

खेळाडू तयार करणार
धोनी प्रतिभावंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊ इच्छित आहे. यासाठी एका ग्लोबल स्कूलच्या योजनेवर तो काम करत आहे. एका छोट्या शहरातून आलेल्या धोनीने ज्या पद्धतीनं यशाचा झेंडा रोवला त्याचप्रमाणे लहान शहरांतील खेळाडूंसाठी एम एस धोनी क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा त्याचा प्लॅन आहे. देशातील काही शहरांमध्ये या अकॅडमी सुरु देखील झाल्याची माहिती आहे.

MS Dhoni Retires: मै पल दो पल का शायर हूँ... निवृत्ती जाहीर करताना महेंद्र सिंह धोनी भावूक

धोनीनं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं

धोनीनं एक क्रिकेटर आणि एक कर्णधार या नात्यानं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं आहे. 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, 2011 सालचा वन डे विश्वचषक, 2012 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, याच कालावधीत कसोटी क्रमवारीतला नंबर वन ही सारी कामगिरी म्हणजे कर्णधार म्हणून धोनीच्या यशाचा परमोच्च बिंदू होता. त्याच वेळी एक फलंदाज आणि तेही अखेरच्या षटकांत विजयी घाव घालणारा फलंदाज म्हणून धोनीचं कर्तृत्व खूप मोठं होतं. त्यानं 15 वर्षांच्या कारकीर्दीत 350 वन डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या खात्यात 10 शतकं आणि 73 अर्धशतकांसह 10 हजार 773 धावा जमा आहेत. धोनीनं 98 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 37.60 च्या सरासरीनं 1617 फटकावल्या आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याचा स्ट्राईक रेट तर तब्बल 126.13 आहे. ही सारी कामगिरी लक्षात घेऊनच धोनीला कॅप्टन कूल आणि मॅचफिनिशर या उपाधी त्याला मानानं बहाल करण्यात आल्या होत्या.



संबंधित बातम्या :

Suresh Raina Retires | महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती

MS Dhoni Retires: महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास 

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर साक्षी भावूक, म्हणते... 

MS Dhoni | 'या' तीन क्षणांनी महेंद्र सिंह धोनीला भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवून दिलं  

MS Dhoni Retires: मै पल दो पल का शायर हूँ... निवृत्ती जाहीर करताना महेंद्र सिंह धोनी भावूक