चेन्नई : भारतानं पहिल्याच वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. काल (रविवारी) झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्या आणि एमएस धोनीच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारतानं 281 धावांपर्यंत मजल मारली. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत धोनीनं 79 धावा करत टीम इंडियाला सावरलं. याचबरोबर त्यानं एक मोठा विक्रमही रचला.
या सामन्यात 79 धावा करत धोनीनं मायदेशात 4000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. मायदेशात 4000 धावा करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
याआधी फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं भारतात 4000 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता धोनी थेट सचिनच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. कारण, या दोघांशिवाय असा विक्रम अद्याप कोणत्याही भारतीय क्रिकेटरनं केलेला नाही.
यासोबतच धोनी जगातील दुसरा विकेटकीपर आहे की, ज्याने मायदेशात 4000 धावा केल्या आहेत. याआधी हा विक्रम फक्त श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर जमा होता.
याचबरोबर धोनीनं यावेळी आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डेत अर्धशतक झळकावून, आजवरच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अर्धशतकांचं शतक साजरं केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात अर्धशतकांचं शतक झळकावणारा धोनी हा भारताचा चौथा आणि जगभरातला तेरावा फलंदाज ठरला.
धोनीच्या नावावर कसोटीत 33, वन डेत 66 आणि ट्वेन्टी ट्वेन्टीत एक अशी मिळून 100 आंतरराष्ट्रीय अर्धशतकं आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सचिन तेंडुलकरनं सर्वाधिक 164, राहुल द्रविडनं 146 आणि सौरव गांगुलीनं 107 अर्धशतकं फटकावली आहेत. धोनी आता त्या तिघांच्या पंक्तीत येऊन दाखल झाला आहे.
दरम्यान, या सामन्यात सुरुवातीलाच भारतीय संघ गडगडला होता. 100 धावांच्या आतच भारतानं पाच गडी गमावले होते. त्यावेळी केदार जाधवनं 40 धावा करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ऐनवेळी तो बाद झाला.
त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्यानं हळूहळू सुरुवात करत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. त्यानं 83 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. धोनीनंही एक बाजू लावून धरली. या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत धोनीनं फलंदाजी करत भारताला 280 धावांचा टप्पा पार करुन दिला.
संबंधित बातम्या :
धोनीचा नवा विक्रम, अर्धशतकांचं शतक पूर्ण!
#IndVsAus : चेन्नई वनडेमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
धडाकेबाज धोनीची नव्या विक्रमाला गवसणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2017 09:44 AM (IST)
मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत महेंद्रसिंह धोनीनं 79 धावा करत टीम इंडियाला सावरलं. याचबरोबर त्यानं एक मोठा विक्रमही रचला.
Indian cricket player Mahendra Singh Dhoni bats during the first one-day international cricket match between India and Australia in Chennai, India, Sunday, Sept. 17, 2017. (AP Photo/Rajanish Kakade)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -