मुंबई : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सुकाणू समितीच्या वतीनं आज (14 ऑगस्ट) राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या मतदार संघात राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. तर अजित नवलेंच्या नेतृत्वाखाली अकोले येथे जक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि इतर  मागण्यांसाठी हे चक्का जाम आंदोलन करण्यात येतआहे. तसेच उद्या म्हणजेच 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु न देण्याचा इशाराही सुकाणू समितीनं दिला आहे.

सरकारने कर्जमाफी केली नाही, शिवाय इतर मागण्यांवरही गांभीर्याने विचार केलेला नाही, त्यामुळे महाराष्ट्रात चक्का जाम करु, असा इशारा सुकाणू समितीने शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला होता.

सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र सरकारचे निकष आणि जाहीर केलेल्या कर्जमाफीला सुकाणू समितीचा विरोध आहे. त्यामुळे वारंवार मागणी करुनही सरकारने गांभीर्याने विचार न केल्यामुळे सुकाणू समितीने आता राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला.

संबंधित बातम्या :

15 ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु देणार नाही : सुकाणू समिती

शेतकरी कर्जाबाबतचा जीआर तातडीने रद्द करा: सुकाणू समिती


सुकाणू समितीने 10 हजारांच्या मदतीच्या जीआरची कॉपी जाळली


संपूर्ण कर्जमाफी न केल्यास राज्यव्यापी आंदोलन : सुकाणू समिती