Pakistan Cricketer Rashid Latif Emotional Tributes To Dharmendra : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनानं बॉलिवूडवर (Bollywood News) शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या 'ही-मॅन'चं (He Man Dharmendra) जाणं प्रत्येकाच्या आयुष्यात पोकळी निर्माण करणारं ठरलं. संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसोबतच क्रीडा विश्व आणि शेजारी देशांनाही मोठा धक्का बसला आहे.
सोमवार रोजी 89 वर्षांच्या वयात “ही-मॅन ऑफ बॉलीवुड” यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे जाणे म्हणजे फक्त एका अभिनेत्याचा मृत्यू नाही, तर भारतीय सिनेमाच्या एका सुवर्णयुगाचा अंत आहे. फक्त भारतातच नाही, तर पाकिस्तानमध्येही धर्मेंद्र यांचे कोट्यवधी चाहते होते. पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार राशिद लतीफ यांनीही भावनिक शब्दांत श्रद्धांजली वाहिली.
राशिद लतीफ यांची भावुक श्रद्धांजली
धर्मेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना राशिद लतीफ म्हणाले की, “धर्मेंद्रजी हे एक दिग्गज नायक होते. ‘शोले’सारखा अजरामर चित्रपट आजही आमच्या मनात कोरला आहे. ते भारतातच नाही, तर पाकिस्तानमध्येही अत्यंत लोकप्रिय होते. त्यांचा वारसा नेहमीच लक्षात ठेवला जाईल.”
89 व्या वर्षी झाले निधन
काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना जुहू येथील निवासस्थानी आणले होते. मात्र सोमवार सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनाची बातमी समजताच संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली.
भारताच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी माध्यमांवरून धर्मेंद्र यांना आठवत भावनिक संदेश पोस्ट केले. वीरेंद्र सहवाग म्हणाले की, “धर्मेंद्रजी हे फक्त अभिनेते नव्हते, ते एक युग होते. त्यांची साधी, माणुसकीची वृत्ती आणि त्यांची स्टाइल... हे सगळं सोनेरी होतं. अनेक पिढ्या त्यांना स्मरणात ठेवतील.”
हरभजन सिंह यांनी म्हटले की, “धर्मेंद्रजींची शालीनता, ताकद आणि त्यांचं आकर्षण सदैव लक्षात राहील. त्यांची स्मितहास्य आणि त्यांचं सिनेमातील तेज नेहमी जिवंत राहील.” सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा इंडस्ट्रीचा 'ही-मॅन' बनला
धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला. आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल की, त्यांचं खरं नाव केवल कृष्ण देओल होतं. पण, सिनेसृष्टीत त्यांची ओळख धर्मेंद्र अशीच होती. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबात झालेला.
धर्मेंद्र यांचं वडिलोपार्जित गाव लुधियानातील पखोवाल तहसीलमधील रायकोटजवळील डांगो आहे. धर्मेंद्र यांनी त्यांचं सुरुवातीचं आयुष्य सहनेवाल गावात घालवलं आणि लुधियानातील लालटन कलान येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलेलं. त्यांचे वडील गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते.
हे ही वाचा -
मोठी बातमी: स्मृती मानधनाचे वडील आता ठणठणीत, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज; आता कधी होणार लग्न?