कराड, सातारा : महाराष्ट्र पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांची आज 41वी पुण्यतिथी आहे. असे असताना कराडमधील प्रीतीसंगम (Yashwantrao Chavan Priti Sangam) या ठिकाणी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी अद्याप उपस्थिती लावलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना विसरले आहेत का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. केवळ या ठिकाणी आज खासदार सुप्रिया सुळे यांचा नियोजित दौरा असून या ठिकाणी दरवर्षी पाहायला मिळणारी कार्यक्रमांची रेलचेल दिसून येत नाहीये.

Continues below advertisement

राजकारण, समाजकारण किंवा एखाद्या सभेला संबोधित करताना ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊन सुरुवात केली जाते त्यांनाच आज राजकीय मंडळी विसरली आहे का? असा प्रश्न पडला आहे. असे असताना याच मुद्दयावरुन यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीला (Priti Sangam) प्रशासन आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित नसल्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार, अशी माहिती देत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

Continues below advertisement

Supriya Sule : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे नेते

यशवंतराव चव्हाण हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते आहेत. हिमालय अडचणीत असताना देशासाठी यशवंतराव चव्हाण नावाचा हा सह्याद्री धावून गेला होता, हा इतिहास आहे. सरकार कोणाचेही असो, त्यांनी इथे याला हवं होतं. यशवंतराव चव्हाण यांना मानसन्मान पाळलाच पाहिजे. या संदर्भात मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार, अशी माहिती देत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

Supriya Sule :  या संदर्भात मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार

महाराष्ट्र पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांची आज 41वी पुण्यतिथी असून खासदार सुप्रिया सुळे या समाधी स्थळी अभिवादनासाठी दाखल झाल्या. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सातारा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा पाटील, शिवसेना गटाचे नेते राजेंद्रसिंह यादव त्यांच्यासोबत लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर अभिवादानाला आले आहेत.

हेही वाचा