मुंबई : दिल्ली उच्च न्यायालयाने पैलवान सुशील कुमारला दिलासा दिलेला नसला, तरी भारतीय कुस्ती महासंघाला नोटीस बजावून सुशील कुमारची बाजू ऐकून घेण्याची सूचना केली आहे.


 

 
नरसिंग यादवनं जागतिक कुस्तीत कांस्यपदक पटकावून रिओ ऑलिम्पिकचा कोटा मिळवला असला तरी, भारतीय कुस्ती फेडरेशननं नरसिंग यादवशी आपली चाचणी कुस्ती खेळवूनच रिओ ऑलिम्पिकला कुणाला पाठवायचं हा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी सुशील कुमारनं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती.

 

 
या प्रकरणात उच्च न्यायालयानं भारतीय कुस्ती फेडरेशन आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला त्यांची बाजू मांडण्याचे आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 27 मे रोजी होणार आहे. त्याआधी सुशीलकुमार आणि भारतीय कुस्ती फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट होण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या :


महाराष्ट्राच्या नरसिंग यादवविरोधात सुशीलकुमारचा शड्डू


पैलवान सुशील कुमार रिओ ऑलिम्पिकसाठी कोर्टात