मुंबई : अनेकदा काय होतं की, आपला स्मार्टफोन जुना झाला आहे, असा विचार करुन नाराज होऊन बसतो आणि नवा स्मार्टफोन घेण्यासाठी बजेटही नसतो. मग नाराज होण्यापलिकडे काही हाती उरत नाही. मात्र, आता आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचा फोन ‘स्मार्ट’ करु शकता. असे काही अॅप्स आहेत, ज्यामुळे फोन नव्या रंगात-ढंगात वापरु शकता.


 

स्नॅपसीड (Snapseed) : स्मार्टफोनवरुन फोटो काढून तुम्ही सोशल साईटवर अपडेट करता. मात्र, फोटो एडिटरच्या मदतीने फोटोला आणखी वेगळ्या इफेक्ट्सनी एडिट करु शकता. यासाठी तुम्हाला स्नॅपसीड अॅप उत्तम पर्याय आहे.

 

अनक्लाऊडीड (Unclouded) : तुमच्या स्मार्टफोनमध्ये लिमिटेड मेमरी असेल, तर मोबाईल स्लो आणि हँग होण्यास सरुवात होते. यावर उपाय म्हणजे अनक्लऊडीड अॅप. याद्वारे संपूर्ण क्लाऊड डेटा एकाच अॅपमध्ये मॅनेज केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुमच्या फोनची मेमरी वाचू शकते.

 

गूगल ड्राईव्ह (Google Drive) : तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स अस्ताव्यस्तपणे कम्प्युटरमध्ये पडलेले असतात. मात्र, गूगल ड्राईव्हच्या मदतीने तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स मॅनेज करुन स्टोरेज करु शकता.

 

पिक्सआर्ट (PicsArt) : फोटोशॉप्स अॅप्समध्ये ‘पिक्सआर्ट’कडे एक उत्तम अॅप म्हणून पाहिले जाते. यामध्य अॅडव्हान्स लेव्हल टूल्स असून, फोटो कोलाजही बनवू शकता. फोटोंचं स्केचही करु शकता.

 

एव्हरनोट (EverNote) : एव्हरनोट डिजिटल मल्टी टूल आहे. यामध्ये लिस्ट कीपर, नोट टेकर, व्हॉईस रेकॉर्डर, टू-डू लिस्ट मॅनेजर आणि वेब क्लिप्परही देण्यात आले आहेत. यामधील ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉगिनिशन फीचर्सच्या माध्यमातून टेक्स्ट सर्चेबलही करु शकता. डॉक्युमेंट्सना स्कॅन करण्याची सुविधाही या अॅपमध्ये देण्यात आली आहे.