मुंबई : जेसन रॉयच्या नाबाद 91 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सनं आयपीएलच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. वानखेडे स्टेडियमवरचा हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला.
दिल्लीनं हा सामना जिंकून मोसमातला पहिला विजय साजरा केला. मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला. मुंबईनं दिल्लीला विजयासाठी 195 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. पण दिल्लीनं ते आव्हान अवघ्या तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.
दिल्लीकडून सलामीच्या जेसन रॉयनं सहा चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 91 धावांची खेळी केली. त्याआधी सूर्यकुमार यादव आणि एविन लुईसच्या शतकी भागिदारीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं सात बाद 194 अशी मजल मारली होती.
सलगच्या तीन पराभवामुळे मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानावर गेलं आहे. तर दिल्लीने पहिलाच विजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे.
मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव, दिल्लीचा पहिलावहिला विजय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Apr 2018 09:21 PM (IST)
जेसन रॉयच्या नाबाद 91 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सनं आयपीएलच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -