अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यात एका 16 वर्षीय मुलीला वडिलांसमोरच चारचाकी वाहनात उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे अहमदनगरमधील गुन्हेगारी पुन्हा एकदा उजेडात आली आहे.


बारागाव नांदुर परिसरात ही 16 वर्षीय मुलगी रात्री घरात झोपली असताना मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास वाळू तस्कर किशोर माळीसह आलेल्या तिघांनी तिला पळवून नेलं. यावेळी मुलीच्या वडिलांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना धमकावत अंधाराचा फायदा घेऊन अपहरणकर्त्यांनी पळ काढल्याचा आरोप होत आहे.

किशोर माळी हा अट्टल गुन्हेगार आणि वाळू तस्कर असून त्याच्यावर राहुरी पोलिस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. पण या घटनेमुळे मुली आपल्या घरातही सुरक्षित नाहीत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.