U23 Asian wrestling championships 2022: टोकियो ऑलिम्पियन दीपक पुनियानं (Deepak Punia) किर्गिझस्तानमध्ये 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 मध्ये 86 किलो फ्रीस्टाइल वजन गटात मक्सत सत्याबेल्डीला पराभूत करून कांस्यपदक जिंकलंय. दीपकच्या बाजूनं हा एक अप्रभावी निकाल होता. कारण, भारतीय संघाला जागतिक चॅम्पियनशिपच्या रौप्यपदक विजेत्याकडून स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती.


दरम्यान, olympic.com दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये पुनियाला उझबेकिस्तानच्या अझीझबेक फैझुलेव आणि किर्गिझस्तानच्या नुरतिलेक करिपबाएव यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर त्यानं किर्गिझस्तानच्या सत्यबेल्डीला पराभूत करून भारतासाठी कांस्यपदक जिंकलंय. 


दीपक पुनियाचा 2022 च्या राष्ट्रकुल खेळासाठी भारतीय कुस्ती संघात समावेश
टोकियो 2020 पदक विजेते बजरंग पुनिया आणि रवी कुमार दहिया यांच्यासह दीपक पुनियाचा गेल्या महिन्यात 2022 च्या राष्ट्रकुल खेळासाठी भारतीय कुस्ती संघात समावेश करण्यात आला होता. भारतानं या स्पर्धेत 23 वर्षांखालील स्पर्धेत 10 सुवर्ण पदकांसह एकूण 25 पदकं जिंकली. आठ दिवसीय कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिपची रविवारी सांगता झाली. 


दीपक कुमारची कामगिरी
दीपकने वर्ल्ड चॅम्पियनशिप 2019 मध्ये रौप्य पदक जिंकलंय. यापूर्वी त्यानं 2018 मध्ये जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकलं होते. त्यानंतर लगेचच त्याने सुवर्णपदकही पटकावलं. आशियाई चॅम्पियनशिपमध्येही त्यानं अनेक वेळा अप्रतिम कामगिरी केली आहे. यापुढील चॅम्पियनशिपमध्ये त्याच्याकडून अनेक पदक जिंकण्याची अपेक्षा केली जात आहे. 


हे देखील वाचा-