David Warner : ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) एकदिवसीय क्रिकेटला (One Day Cricket) रामराम ठोकलाय. कसोटी क्रिकेटमधून त्याने यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती. आता त्याने एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती (Retirement)

  घेत असल्याचे जाहीर केलं आहे. पाकिस्तानविरोधात तो शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. दरम्यान, "मी चांगला खेळत राहिलो आणि ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी माझी गरज पडली, तर पुन्हा एकादा संघात परत येईल." ऑस्ट्रेलियाला 2023 चा विश्वचषक जिंकवून देण्यात मोठा वाटा असलेल्या डेव्हिड वॉर्नरने मायदेशापेक्षा विदेशात जास्त फटकेबाजी केली आहे. डेव्हिड वॉर्नरची भारताविरोधातील आकडेवारी जाणून घेऊयात...


भारताविरोधात वॉर्नरची कामगिरी (David Warner Against Team India ) 


भारताच्या विरोधात मायदेशात (ऑस्ट्रेलियात) आणि विदेशातही डेव्हिड वॉर्नरची कामगिरी उत्कृष्ट राहिलीये. 2012 पासून आत्तापर्यंत डेव्हिड वॉर्नरने भारताविरोधात 26 डावांमध्ये 1222 धावा केल्या आहेत. नाबाद 128 धावा ही त्याची सर्वोकृष्ट कामगिरी आहे. वॉर्नरने भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियातीली मैदानांव 3 शतकं आणि 9 अर्धशतके झळकावली. तर 26 मधील 12 वनडे त्याने ऑस्ट्रेलियात खेळल्या आहेत. 12 वनडेमध्ये त्याने 600 धावा काढल्या आहेत. 


भारतीय मैदानावर वॉर्नरची फटकेबाजी 


भारतीय मैदानांवर डेव्हिड वॉर्नरने दमदार कामगिरी केलीये. भारतात खेळलेल्या वनडे सामन्यांमध्ये त्याने 50 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. वॉर्नरने 23 सामन्यांमध्ये 1110 धावा काढल्यात. 163 धावा ही त्याची सर्वोकृष्ट कामगिरी आहे. भारताविरोधातील वॉर्नरच्या कामगिरीमध्ये 4 शतकांचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. 


वॉर्नरची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी (David Warner) 


डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 161 सामने खेळत 6932 धावा केल्या आहेत.त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 97.26 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. यामध्ये 22 शतके आणि ३३ अर्धशतकांचा  समावेश आहे. डेव्हिड वॉर्नरने 2009 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. होबार्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा सामना खेळवण्यात आला होता. रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट, मायकल क्लार्क आणि स्टिव्ह वॉ यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नच्या नावावर आहे. 


2023 च्या वर्ल्डकपमध्ये डेव्हिड वॉर्नरची दमदार कामगिरी (David Warner In 2023 World Cup)


डेव्हिड वॉर्नरने 2023 मध्ये भारतात खेळवण्यात आलेल्या विश्वचषकात दमदार कामगिरी केलीये. त्याने कांगारुंच्या संघातून सर्वाधिक धावा केल्या. वॉर्नरने वर्ल्डकपमध्ये 11 सामने खेळले. त्याने वर्ल्डकपमध्ये 108.29 च्या स्ट्राईक रेटने 535 धावा काढल्या. यामध्ये 2 शतकांचाही समावेश होता. त्याने पाकविरुद्धच्या सामन्यात 163 धावांची खेळी केली होती. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या 


David Warner ODI Retirement : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूची निवृत्ती