Gukesh defeated Ding Liren to win World Chess Championship : भारताचा ग्रँडमास्टर डोम्माराजू गुकेश याने गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी करताना चीनच्या डिंग लिरेन याला चेकमेट करत जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तो बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावणारा सर्वात युवा आणि पहिला किशोरवयीन बुद्धिबळपटू ठरला. वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय गँगमास्टर डी गुकेशने त्याच्या आईशी फोनवर संवाद साधला. 




गुकेशने सांगितले की, फोनवरील संभाषणादरम्यान तो आणि त्याची आई रडत होते. आई-वडिलांच्या योगदानाबद्दल बोलताना गुकेश म्हणाला, माझा देवावर विश्वास आहे आणि त्याने मला अनेक प्रसंगी मदत केली आहे. याचे उदाहरण म्हणजे मी गेल्या वर्षी पात्र ठरू शकलो नव्हतो, त्यावेळी माझ्या आईने सांगितले होते की, बुद्धिबळाचा आनंद घेत राहा. तुझे स्वप्न एक दिवस पूर्ण होईल.




वयाच्या सहाव्या वर्षापासून पाहत होता स्वप्न


गुकेश म्हणाला, मी वयाच्या सहा-सातव्या वर्षापासून जगज्जेते होण्याचे स्वप्न पाहत होतो आणि तो क्षण जगत होतो. प्रत्येक बुद्धिबळपटूला हा क्षण जगायचा असतो.


आनंद सरांनी दिली साथ


गुकेश म्हणाला की, खरंतर विशी सर (विश्वनाथन आनंद) अधिकृतपणे कधीच संघाचा भाग नव्हते, पण ते मला नेहमी सपोर्ट करत होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. 2013 मध्ये मी विशी सर आणि मॅग्नस यांना पाहिले आणि मला वाटले की, एक दिवस तिथे असणे खरोखरच खूप छान असेल आणि प्रत्यक्षात तिथे असणे आणि तिथे बसणे आणि माझ्या शेजारी भारतीय ध्वज पाहणे हा कदाचित सर्वोत्तम क्षण होता. जेव्हा कार्लसन जिंकला तेव्हा मला वाटले होते की एक दिवस मी हे विजेतेपद भारतात परत आणीन.


माझ्या नजरेत डिंग वर्ल्ड चॅम्पियन


गुकेश म्हणाला, डिंग लिरेन कोण आहे हे सर्वांना माहीत आहे. अनेक वर्षांपासून तो खेळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. माझ्यासाठी तो खरा जगज्जेता आहे. डिंग खऱ्या चॅम्पियनप्रमाणे लढला. मी माझ्या प्रतिस्पर्ध्याचे आभार मानू इच्छितो.


हे ही वाचा -


D Gukesh : विश्वनाथन आनंदनंतर दुसरा जगज्जेता ठरलेला डोमराजू गुकेश कोण आहे? संपूर्ण प्रवास एका क्लिकवर