Jeremy Lalrinnunga in India : भारताने यंदा कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये कमाल प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. भारताने स्पर्धेत एकूण 61 पदकांवर नाव कोरलं. ज्यात 22 सुवर्णपदतकांचा समावेश होता. दरम्यान या शानदार प्रदर्शनानंतर आता खेळाडू मायदेशी परतत असून युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा (Jeremy Lalrinnunga) हा देखील मायदेशी परतला असताना त्याचं अगदी भव्य स्वागत करण्यात आलं आहे. जेरेमीने 67 किलोग्राम कॅटेगरीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.


कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक मिळवणं एक मोठी गोष्ट असल्याने तसंच मोठं असं भव्य स्वागतही जेरेमी याचं भारतात करण्यात आलं. जेरेमी हा मूळचा मिझोरम येथील असून त्याचं आयजोल एअरपोर्टवर पोहचल्यानंतर अगदी भव्य असं स्वागत करण्यात आलं. एअरपोर्टवर जेरेमीच्या स्वागतासाठी त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह मिझोरमचे क्रिडामंत्री आणि मिझोरमच्या ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष रॉबर्ट रामविया रोयटे हे देखील उपस्थित होते. 


'अडचणींचा सामना करुन जेरेमीनं मिळवलं यश'


यावेळी रॉबर्ट रामाविया रोयटे म्हणाले, 'जेरेमीने बऱ्याच अडचणींचा सामना करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवलं आहे. गरीबी देखील त्याच्या यशाच्या मध्ये अडचण म्हणून टिकू शकली नाही.' तसंच जेरेमी आणि कांस्य पदक विजेत्या महिला हॉकी संघाची सदस्य लालरेम्सियामी यांच्यासाठी भव्य कार्यक्रम आयोजित करणार असल्याचंही ते म्हणाले. 


पाहा VIDEO-






 


जेरेमीनं जिंकलं सुवर्णपदक


वेटलिफ्टिंगच्या 67 वजनी गटात सुवर्ण कामगिरी करणाऱ्या जेरेमीनं स्नॅच इव्हेंटमध्ये 140 किलो वजन उचलून नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलून एकूण 300 किलो ग्रॅम वजन उचललं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हा देखील एक नवीन विक्रम आहे. या स्पर्धेतील अखेरच्या प्रयत्नात जेरेमीला अपयश आलं. मात्र, तरीही त्यानं सुवर्णपदकावर नाव कोरून बर्मिंगहॅम येथे भारताचा तिरंगा फडकावला.  जेरेमी हा मिझोराममधील आयझोल येथील रहिवासी आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील त्याचं पहिलचं वर्ष आहे. याआधी 2018 मध्ये त्यानं युवा ऑलम्पिक स्पर्धेतील 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.  


हे देखील वाचा-