CWG Live Updates Day 9: क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट्स
इंग्लंडमधील बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ 2022 मध्ये (Birmingham 2022 Commonwealth Games) आज देखील भारताकडे पदकं जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 07 Aug 2022 02:12 AM

पार्श्वभूमी
CWG 2022 Day 9 India Schedule: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) आज शनिवारी भारत विविध खेळांमध्ये सहभागी होईल. यावेळी भारतीयांचं खास लक्ष कुस्तीपटूंवर असेल, कारण आज सर्वाधिक...More
CWG 2022 Day 9 India Schedule: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) आज शनिवारी भारत विविध खेळांमध्ये सहभागी होईल. यावेळी भारतीयांचं खास लक्ष कुस्तीपटूंवर असेल, कारण आज सर्वाधिक त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. यावेळी ऑलिम्पिक पदक विजेता रवी दहिया, विनेश फोगाट मैदानात उतरतील. भारतीय क्रिकेट संघ अंतिम सामन्यात एन्ट्रीसाठी मैदानात उतरले. कुस्तीपटूंकडे खास लक्षशुक्रवारी भारताने कुस्तीमध्ये तब्बल 6 पदकं मिळवली,ज्यातील तीन गोल्ड आहेत. आजही भारताचे कुस्तीपटू मैदानात उतरणार असल्याने त्यांच्याकडे खास लक्ष असेल.ग्रुप ए, महिला 50 किलो : पुजा गेहलोट विरुद्ध क्रिस्टेल लेचिदजियो (स्कॉटलंड)ग्रुप ए, महिला 50 किग्रा: पूजा गहलोत विरुद्ध रेबेका मुआम्बो (CMR)महिला 53 किलो : मर्सी अदेकुओरोये (NGR) विरुद्ध विनेश फोगाटमहिला 53 किलो : विनेश फोगाट बनाम सामंथा स्टीवर्ट (CAN)राउंड ऑफ 16, उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 74 किलो : नवीनउपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, महिला 76 किलो : पूजा सिहागोउपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 57 किलो : रवी कुमार दहियाउपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 97 किलो : दीपक नेहरादुसरे सत्र रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुकांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिला 50 किलो (पुजा गेहलोटने पात्रता मिळवल्यास)कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 57 किलो (रवीकुमार दहियाने पात्रता मिळवल्यास)कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिला 53 किलो (विनेश फोगाटने पात्रता मिळवल्यास)कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 74 किलो (नवीनने पात्रता मिळवल्यास)कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिल 76 किलो (पूजा सिहागने पात्रता मिळवल्यास)कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 96 किलो (दीपक नेहराने पात्रता मिळवल्यास)भारतीय महिला हॉकी संघ मैदानात उतरणारभारतीय महिला हॉकी संघ आज सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून (India vs Australia) पराभूत झाल्यामुळे आता कांस्य पदकाच्या सामन्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतणार आहे. भारतासाठी कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी-सुवर्णपदक- 9 (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, साक्षी मलिक)रौप्यपदक- 11 (संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, प्रियांका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अंशू मलिक)कांस्यपदक- 9 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह, तेजस्वीन शंकर, मोहित ग्रेवाल, दिव्या काकरन)हे देखील वाचा-CWG 2022 Day 9 Schedule: आजही कुस्तीपटू जलवा दाखवण्यासाठी सज्ज, महिला क्रिकेट संघ फायनलमध्ये पोहचण्यासाठी उत्सुक, कसं आहे नवव्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक?
CWG 2022 Day 9 Live Updates : बॉक्सिंगमध्ये तीन पदकं निश्चित
भारतीय बॉक्सर अमित पांघल आणि नीतू घंघासनंतर आता सागर याने देखील नायजेरीयाच्या बॉक्सरला मात देत थेट फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. त्यामुळे त्याठिकाणी देखील भारताचं किमान रौप्य पदक निश्चित झालं आहे.