CWG Live Updates Day 8: क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट्स

इंग्लंडमधील बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ 2022 मध्ये (Birmingham 2022 Commonwealth Games) शुक्रवारी सर्वांच्या नजरा भारताच्या कुस्तीपटूंवर खास असतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Aug 2022 02:33 AM
CWG Day 8 Live Updates : भारताचं पदक निश्चित

लॉन बाऊल्समध्ये पुरुषांच्या गटाने इंग्लंडला 13-12 ने मात देत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताचं किमान रौप्यपदक निश्चित झालं आहे.

CWG Day 8 Live Updates : भारतीय महिला पराभूत

महिला हॉकी चषकाच्या सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय महिलांना ऑस्ट्रेलियानं 3-0 नं मात दिली आहे.

CWG Day 8 Live Updates : हिमा दासचं पराभूत

भारताची आघाडीची धावपटू हिमा दास महिला 200 मीटरच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी झाली आहे. 

CWG Day 8 Live Updates : मोहित ग्रेवालने जिंकलं कांस्यपदक

पुरुषांच्या 125 किलोग्राम वजनी गटात मोहित ग्रेवालने कांस्य पदक नावे केलं आहे. आधीच्या सामन्यात पराभूत मोहितने आता जमाईकाच्या आरॉन जॉन्सनला (Aaron Johnson) मात देत कांस्य पदकावर नाव कोरंल आहे.

CWG Day 8 Live Updates : लक्ष्य सेन, आकार्शी कश्यप विजयी

बॅडमिंटनच्या एकेरी लढतीत लक्ष्य सेनच्या ऑस्ट्रेलियाच्या यियान झियांग लिनला 21-9 आणि 21-16 च्या फरकाने विजय मिळवला. तर आकार्षी कश्यपने सायप्रसच्या इवा कट्टिर्झीचा 21-2, 21-7 असा पराभव केला.

CWG Day 8 Live Updates : भारतीय कुस्तीपटूंची दमदार कामगिरी, पाच पदकं खिशात

आज भारताचे कुस्तीपटू कॉमनवेल्थमध्ये अक्षरश: पदकांचा पाऊस पाडत आहे. अंशूने रौैप्य तर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने सुवर्णपदक मिळवल्यानंतर कुस्तीपटू दीपक पुनियानेही सुवर्णपदकाला गवसणी घातली. ज्यानंतर सेमीफायनलमध्ये पराभूत दिव्या काकरनने कांस्य पदक मिळवलं आहे. ज्यामुळे भारताची पदकसंख्या 25 वर गेली आहे.








 

CWG Day 8 Live Updates : अंशूनं मिळवून दिलं रौप्यपदक

कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022) भारताला कुस्तीमधील पहिलं पदक महिला कुस्तीपटू अंशू मलिकने मिळवून दिलं आहे. ती फायनलमध्ये पराभूत झाल्याने तिला रौप्यपदक मिळालं आहे. 

CWG Day 8 Live Updates : भारताची चार पदकं निश्चित

कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022) भारताचे पुरुष आणि महिला कुस्तीपटू कमाल फॉर्ममध्ये दिसून येत आहे. पुरुषांमध्ये बजरंग पुनिया, दीपक पुनियातर महिलांमध्ये साक्षी मलिक आणि अंशू मलिक यांनी थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. यामुळे भारताची स्पर्धेत किमान चार रौप्यपदकं निश्चित झाली आहेत. 

CWG Day 8 Live Updates : भारतीय कुस्तीपटूंची कमाल

भारतीय कुस्तीपटू कमाल कामगिरी करत असून बजरंग पुनिया, दीपक पुनिया यांच्यासह साक्षी आणि अंशू मलिक यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

CWG Day 8 Live Updates : महिला एकेरीत सिंधू विजयी

महिला एकेरीत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने युगांडाच्या हुसीना कोबुगाबे  21-10, 21-9 च्या फरकाने मात देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.

CWG Day 8 Live Updates : पुरुष 400 मीटर रिले शर्यतीत भारत फायनलमध्ये

पुरुषांच्या 400 मीटर रिले रेसमध्ये भारत फायनलमध्ये पोहोचला आहे. दुसऱ्या हीटमध्ये भारतीय संघाने दुसऱ्या स्थानावर राहत 3.6.9 मिनिटं इतकी वेळ घेतली.

CWG Day 8 Live Updates : कुस्ती सामन्यांना पुन्हा सुरुवात

कॉमनवेल्थ स्पर्धेत सुरक्षेच्या त्रुटींमुळे कुस्ती सामने मध्येच थांबवण्यात आले होते. पण आता पुन्हा सामने सुरु झाले असून भारताचे कुस्तीपटू पदकं मिळवण्याची दाट शक्यता आहे.  

CWG Day 8 Live Updates : पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत विजयी

पुरुष एकेरीत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याने श्रीलंकेच्या डुमिंडु अबेविक्रमाला  21-9, 21-12 च्या फरकाने मात देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.

CWG Day 8 Live Updates : पॅरा टेबल टेनिसमध्ये भारताचं पदक निश्चित

भारताची दिग्गज पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेलने सेमीफायनलमध्ये इंग्लंडच्या सु बेलीला 11-6, 11-6, 11-6 च्या फरकाने मात देत फायनलमध्ये एन्ट्री घेतली आहे. यामुळे भारताचं किमान रौप्यपदक निश्चित झालं आहे.

CWG Day 8 Live Updates : कुस्तीमध्ये दीपकसह बजरंग विजयी



कुस्तीमध्ये भारताचे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी कमाल करत आपले पहिले सामने जिंकले आहेत. बजरंगने नॉरूच्या लॉवे बिंघमला 4-0 ने तर दीपक पुनियाने न्यूझीलंडच्या मॅथ्यूला 10-0 ने मात दिली.




पार्श्वभूमी

CWG 2022 Day 8 India Schedule: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) आज शुक्रवारी भारत विविध खेळांमध्ये सहभागी होईल. यावेळी भारतीयांचं खास लक्ष कुस्तीपटूंवर असेल, कारण आज सर्वाधिक त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. यावेळी ऑलिम्पिक पदक विजेता  बजरंग पुनिया (Bajrang Punia) त्याचं सलग दुसरं कॉमनवेल्थ सुवर्णपदक मिळवू शकतो. याशिवाय महिला हॉकी संघ देखील सेमीफायनलचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu), किदम्बी श्रीकांत (Kidambi Srikant) हे देखील मैदानात उतरतील. 


कुस्तीपटूंकडे खास लक्ष


आज दिवसभरात भारत विविध खेळात सहभागी होणार असला तरी कुस्तीपटूंच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण भारताचे कुस्तीपटू चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांच्याकडून पदक मिळण्याची अधिक शक्यता आहे. यामध्ये बजरंग पुनिया,  दीपक पुनिया, मोहितसह महिलांमध्ये अंशु मलिक, साक्षी मलिक आणि दिव्या काकरन यांच्याकडे सर्वांच्या नजरा असतील.


भारतीय महिला हॉकी संघ मैदानात उतरणार


भारतीय महिला हॉकी संघ आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) मैदानात उतरेल. फायनलमध्ये एन्ट्रीसाठी आजचा हा सामना खेळण्यात येणार आहे. 


भारतासाठी कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी-









रौप्यपदक- 7 (संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर.)


कांस्यपदक- 7 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह,  तेजस्वीन शंकर.)


हे देखील वाचा-


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.