CWG Live Updates Day 7: क्रिकेट, बॅटमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट्स

ब्रिटनमधील बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ 2022 मध्ये (Birmingham 2022 Commonwealth Games) गुरुवारी सर्वांच्या नजरा मुरली श्रीशंकर आणि मोहम्मद अनीस याहिया या भारतीय खेळाडूंवर असतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Aug 2022 02:05 AM
CWG 2022 Live Updates: मोहम्मद अनीस याहियाचं अंतिम फेरीत थोडक्यात पदक हुकलं

भारतीय ऍथलेटिक्स मोहम्मद अनीस याहिया अंतिम फेरीत पदक जिंकू शकला नाही. तो 6 प्रयत्नांनंतर 7.97 च्या सर्वोत्तम प्रयत्नासह पाचव्या क्रमांकावर राहिला. याहियां पहिल्या तीन प्रयत्नांत 7.72 मीटरचा सर्वोत्तम प्रयत्न केला. मात्र, त्याचा पहिलाच प्रयत्न फाऊल ठरला. दुसऱ्या प्रयत्नात त्यानं 7.65 मीटर उडी मारली. त्यानंतर तिसर्‍यात प्रयत्नात 7.72 मीटर, चौथ्या प्रयत्नात 7.74 मीटर, पाचव्या प्रयत्नात 7.58 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 7.97 मीटर उडी मारली.

CWG 2022 Live Updates: अंडर-20 भालाफेक स्पर्धेत विवेक कुमार अंतिम फेरीत

जागतिक अंडर-20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला भालाफेकपटू विवेक कुमारनं 69.68 मीटरचा सर्वोत्तम थ्रो करून एकूण 8 व्या स्थानावर राहिला आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला

CWG 2022 Live Updates: भारतीय ऍथलेटिक्स अर्जून वासकळे 800 मीटरच्या उपांत्य फेरीसाठी पात्र 

भारतीय ऍथलेटिक्स अर्जून वासकळे 800 मीटरच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलाय. तो 1:49.83 च्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह एकूण 12 व्या स्थानावर राहिला. तो तिसरा जलद नॉन क्वालिफायर म्हणून पात्र ठरलाय. 


 

CWG 2022 Live Updates: पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताचं पदक हुकलं

महिला पॅरा पॉवरलिफ्टिंग लाइटवेट सामन्यात भारतीय पॅरा अॅथलीट्स चौथ्या आणि पाचव्या स्थानावर राहिल्या. ज्यामुळं भारतानं पदक गमावलं. मनप्रीत कौरनं दुसऱ्या प्रयत्नात सर्वाधिक 82 किलो वजन उचललं आणि तिला 89.6 गुण मिळालं. ती चौथ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, सकिना खातूननं दुसऱ्या प्रयत्नात सर्वाधिक 90 किलो वजन उचललं आणि तिला 87.5 गुण मिळालं. तिनं पाचवे स्थान पटकावलं.

CWG 2022 Live Updates: टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा आणि साथियान जोडीचा विजय

टेबल टेनिसमध्ये साथियान आणि मनिका बत्रा या जोडीनं मिश्र दुहेरीत सेशेल्सच्या क्रिया मिक आणि सिनॉन लॉरा या जोडीचा 11-1, 11-3, 7-1 असा पराभव केलाय. या विजयासह भारतीय जोडीनं उपांत्यपूर्व फेरी गाठलीय.

CWG 2022 Live Updates: भारतीय हॉकी संघाचा वेल्सवर 4-1 नं विजय, सलग चौथ्यांदा कॉमनवेल्थच्या सेमीफायनमध्ये धडक

वेल्सविरुद्ध  4-1 असा विजय मिळवून भारतीय संघानं कॉमनवेल्थच्या उपांत्य फेरीत धडक दिलीय. महत्वाचं म्हणजे, भारतीय हॉकी संघानं सलग चौथ्यांदा कॉमनवेल्थ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवलंय. 

CWG 2022 Live Updates: बॉक्सिंगमध्ये जास्मिनचंही पदक निश्चित

भारताच्या जस्मिननंही बॉक्सिंगच्या 57-60 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यासोबतच तिनं भारतासाठी एक पदकही निश्चित केलं आहे. जस्मिननं उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडच्या टोरी ग्रँटनचा 4-1 असा पराभव केलाय. यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं पाच पदक निश्चित केली आहेत.

CWG 2022 Live Updates: स्क्वॉशमध्ये जोश्ना चिनप्पा- हरिंदर पाल सिंह जोडीचा पराभव

जोश्ना चिनप्पा आणि हरिंदर पाल सिंह यांना स्क्वॉशमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. ऑस्ट्रेलियाच्या डोना लोबान आणि कॅमेरून पिल्ले यांनी भारतीय जोडीचा 8-11, 9-11 असा पराभव केलाय.

CWG 2022 Live Updates: मृदुल बोरगोहेनचा लॉन बॉलमध्ये पराभव

लॉन बॉलमध्ये मृदुल बोरगोहेनचा पराभव झालाय. जर्सीच्या रॉस डेव्हिसनं त्याचा 13-21 अशा फरकानं पराभव केलाय.

CWG 2022 Live Updates: अमित पंघाल दमदार कामगिरी, बॉक्सिंगमध्ये भारतासाठी आणखी एक पदक निश्चित

अमित पंघालनं बॉक्सिंगमध्ये भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले आहे. त्यानं उपांत्य फेरी गाठलीय. अमितनं 48-51 किलो (फ्लायवेट) गटाच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनचा पराभव केला. अमितनं हा सामना 5-0 फरकानं जिंकला.

CWG Live Updates: भारतीय पुरुष हॉकी संघ अव्वल स्थान गाठण्याचा प्रयत्न

भारतीय पुरुष हॉकी संघ वेल्सविरुद्धचा अंतिम गट सामना जिंकून पूल ब मध्ये अव्वल स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल.

CWG Live Updates: स्क्वॉश  मिश्र दुहेरीत सौरव घोषाल- दीपिका पल्लीकल नशीब आजमावतील

कॉमनवेल्थ गेम्स 2022 एकेरी कांस्यपदक विजेता सौरव घोषाल स्क्वॉश स्पर्धेत दीपिका पल्लीकलसह मिश्र दुहेरीत खेळणार आहे. तर, युवा खेळाडू अनाहत सिंह आणि सुनयना कुरुविला महिला दुहेरी स्पर्धेत छाप पाडण्याचा प्रयत्न करतील.


 

CWG Live Updates: हिमा दास आजपासून मोहिमेला सुरुवात करणार

स्टार अॅथलीट हिमा दास कॉमनवेल्थ स्पर्धेत प्रथमच ट्रॅकवर दिसणार आहे. ती 200 मीटर हीटमध्ये आपला दावा मांडणार आहे. हिमादास पहिल्यांदाच कॉमनवेल्ममध्ये 200 मीटरमध्ये स्पर्धा करणार आहे. तिनं गोल्ड कोस्ट 2018 येथे 400 मीटर हीटमध्ये तिचा दावा केला होता, जिथं तिनं सहावं स्थान पटकावलं होतं.

CWG Live Updates: अमित पंघालचा सामना स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनशी होणार

भारतीय बॉक्सर अमित पंघालही पदक जिंकण्याच्या उद्देशानं रिंगमध्ये आपले आव्हान सादर करेल. गोल्ड कोस्ट 2018 रौप्यपदक विजेत्या पंघलचा बर्मिंगहॅम 2022 मध्ये पुरुषांच्या 51 किलो फ्लायवेट स्पर्धेत स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनशी सामना होईल. अमित व्यतिरिक्त, त्याचे सहकारी बॉक्सर जास्मिन लॅम्बोरिया, सागर आणि रोहित टोकस यांनीही उपांत्यपूर्व फेरीतील लढती जिंकल्यास बर्मिंगहॅम 2022 मध्ये भारतासाठी आणखी पदके निश्चित होतील.

पार्श्वभूमी

CWG 2022 Day 7 India Schedule: ब्रिटनमधील बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ 2022 मध्ये (Birmingham 2022 Commonwealth Games) गुरुवारी सर्वांच्या नजरा मुरली श्रीशंकर आणि मोहम्मद अनीस याहिया या भारतीय खेळाडूंवर असतील. दोन्ही खेळाडूंनी लांब उडीच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलंय. एम श्रीशंकर गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे आणि तो आज भारताच्या पदकतालिकेत वाढ करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 


अमित पंघालचा सामना स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनशी होणार
भारतीय बॉक्सर अमित पंघालही पदक जिंकण्याच्या उद्देशानं रिंगमध्ये आपलं आव्हान सादर करेल. गोल्ड कोस्ट 2018 रौप्यपदक विजेत्या पंघलचा बर्मिंगहॅम 2022 मध्ये पुरुषांच्या 51 किलो फ्लायवेट स्पर्धेत स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनशी सामना होईल. अमित व्यतिरिक्त, त्याचे सहकारी बॉक्सर जास्मिन लॅम्बोरिया, सागर आणि रोहित टोकस यांनीही उपांत्यपूर्व फेरीतील लढती जिंकल्यास बर्मिंगहॅम 2022 मध्ये भारतासाठी आणखी पदके निश्चित होतील.


हिमा दास मोहिमेची सुरुवात करणार
स्टार अॅथलीट हिमा दास कॉमनवेल्थ स्पर्धेत प्रथमच ट्रॅकवर दिसणार आहे. ती 200 मीटर हीटमध्ये आपला दावा मांडणार आहे. हिमादास पहिल्यांदाच कॉमनवेल्ममध्ये 200 मीटरमध्ये स्पर्धा करणार आहे. तिनं गोल्ड कोस्ट 2018 येथे 400 मीटर हीटमध्ये तिचा दावा केला होता, जिथं तिनं सहावं स्थान पटकावलं होतं.


स्क्वॉश  मिश्र दुहेरीत सौरव घोषाल- दीपिका पल्लीकल नशीब आजमावतील
कॉमनवेल्थ गेम्स 2022 एकेरी कांस्यपदक विजेता सौरव घोषाल स्क्वॉश स्पर्धेत दीपिका पल्लीकलसह मिश्र दुहेरीत खेळणार आहे. तर, युवा खेळाडू अनाहत सिंह आणि सुनयना कुरुविला महिला दुहेरी स्पर्धेत छाप पाडण्याचा प्रयत्न करतील.


भारतीय पुरुष हॉकी संघ अव्वल स्थान गाठण्याचा प्रयत्न
भारतीय पुरुष हॉकी संघ वेल्सविरुद्धचा अंतिम गट सामना जिंकून पूल ब मध्ये अव्वल स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल.


सांघिक स्पर्धांमध्ये पदके जिंकणारे बॅडमिंटन आणि टेबल टेनिस स्टार गुरुवारपासून आपापल्या एकेरी आणि दुहेरीच्या मोहिमेला सुरुवात करतील. बॅडमिंटन सामना खेळणारी पीव्ही सिंधू ही पहिली भारतीय शटलर असेल.


हे देखील वाचा- 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.