CWG 2022 Day 6 Live Updates: क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताला आणखी पदक मिळण्याची शक्यता आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Aug 2022 01:03 AM

पार्श्वभूमी

Commonwealth Games 2022 Day 6 Live Updates: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताला आणखी पदक मिळण्याची शक्यता आहे. वर्ल्ड चॅम्पियन भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन आपली लढत...More

Gurdeep Singh, CWG 2022: गुरदीप सिंहनं वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकलं

Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या 109 किलोग्राम वजनी गटात भारताचा गुरूदीप सिंहनं कांस्यपदक जिंकलाय. दरम्यान, त्यानं स्नॅचमध्ये 167 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 223 किलोग्राम असं एकूण 390 किलो वजन उचलून बर्मिंगहॅममध्ये भारताचा तिरंगा फडकावलाय. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 17 पदकांवर झडप घातलीय. ज्यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि सहा कांस्यपदक जिंकलंय. विशेष म्हणजे, भारतानं सर्वाधिक पदकं वेटलिफ्टिंग स्पर्धेत जिंकली आहेत.