CWG 2022 Day 3 Live Updates: क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट्स

CWG 2022: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022)  भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Ind vs PAK) भिडणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 Jul 2022 06:52 PM

पार्श्वभूमी

CWG 2022 Day 3 Schedule: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022)  भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Ind vs PAK) भिडणार आहे....More

IND vs PAK, CWG 2022: भारताचा पाकिस्तानवर 8 विकेट्सनं विजय

Commonwealth Games 2022: भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) झुंजार अर्धशतकाच्या (42 चेंडूत 63 धावा) जोरावर भारतानं पाकिस्तानचा 8 विकेट्सनं (India Beats Pakisthan) पराभव केलाय. या पराभवसह पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या संघानं गुडघे टेकले. पावसामुळं या सामन्यातील दोन षटक कमी करण्यात आले. पाकिस्तानला 18 षटकात 99 धावापर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात भारतानं 11.4 षटकात आणि 8 विकेट्स राखून पाकिस्ताननं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं.