CWG Live Updates Day 10: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल, सुवर्णपदक कोण जिंकणार?

CWG 2022 day 10 Live Updates: इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेचा आज दहावा दिवस आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Aug 2022 10:31 PM
CWG 2022 Live Updates : ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स पडल्या

भारताने 100 धावांवर ऑस्ट्रेलिया संघाचे तीन विकेट्स पाडले आहेत.13 ओव्हर्सनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोर 109 वर 3 बाद आहे.

CWG 2022 Live Updates : भारताला पहिलं यश

भारताच्या रेणुका सिंहनं ऑस्ट्रेलियाच्या अॅलिसा हेलीला पायचीत करत भारताला सामन्याच्या सुरुवातीलाच यश मिळवून दिलं आहे.

CWG 2022 Live Updates : कशी आहे भारताची अंतिम 11

CWG 2022 Live Updates : ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक

सुवर्णपदकासाठी भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात सामना सुरु होत असून नुकतीच नाणेफेक झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

CWG 2022 Live Update : भारताच्या खिशात 17 वं सुवर्णपदक, बॉक्सर निखतची कमाल

भारताची आघाडीची बॉक्सर निखतन झरीनने 50 किलो लाईट फ्लायवेट गटात सुवर्णपदक मिळवलं आहे.

CWG 2022: बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा दणदणीत विजय, रौप्यपदक निश्चित

बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीच्या सामन्यात भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं दणदणीत विजय नोंदवला. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीनं चॅन पेंग सून आणि टॅन कियान मेंग या मलेशियाच्या जोडीचा 21-6, 21-15 नं पराभव केला. याविजयासह भारतीय जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला. तसेच भारतासाठी रौप्य पदक निश्चित केलं.

CWG 2022 Live Updates: बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत किदाम्बी श्रीकांतचा पराभव

बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतला पराभव पत्करावा लागलाय. मलेशियाच्या यंगनं त्याला 13-21, 21-19, 21-10 अशा फरकानं पराभूत केलं. मात्र, श्रीकांतला अजूनही कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे.

CWG 2022 Live Updates: भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन फायनलमध्ये

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पुरूष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सिंगापूरच्या जिया हेन्ग तेहचा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिलीय. 

CWG 2022 Live Updates: महिलांच्या 400 मीटर रिले शर्यतीत भारताचं पदक हुकलं

महिलांच्या 400 मीटर रिले शर्यतीत भारताची दुती चंद, हिमा दास, सरबानी नंदा आणि ज्योती यांचा संघ पाचव्या स्थानावर राहिला आणि पदक गमावलं. भारतानं आपली शर्यत 43.81 सेकंदात पूर्ण केली. नायजेरियानं सुवर्ण आणि इंग्लंडने रौप्यपदक जिंकलं. तर, जमैकानं कांस्यपदक पटकावलं.

CWG 2022 Live Updates : बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूसह लक्ष्यचं पदक पक्क

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी सेमीफायनलचे सामने जिंकत फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. त्यामुळे त्यामुळे त्यांनी किमान रौप्यपदक निश्चित केलं असून किदम्बी श्रीकांत मात्र सेमीत पराभतू झाला आहे.

CWG 2022 Live: भारतीय बॉक्सर नीतूची सुवर्णपदकावर झडप

बॉक्सिंगमध्ये नीतूनं महिलांच्या 45-48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. तिनं अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डेमी जेडचा 5-0 असा पराभव केला.

CWG 2022 Live Updates: महिला हॉकी संघानं कांस्यपदक जिंकलं

भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदक जिंकलं. नियमित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केला. यानंतर भारताने न्यूझीलंडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करत कांस्यपदकावर कब्जा केलाय.

CWG 2022 Live Updates: कांस्यपदकासाठी भारतीय महिला हॉकी संघ  मैदानात!

भारतीय महिला हॉकी संघ आणि न्यूझीलंड यांच्यात कांस्यपदकासाठी लढत सुरु झालीय. या सामन्यात भारतीय महिला संघ पदक जिंकतील, अशी अपेक्षा केली जातेय. 


 

CWG 2022 Live Updates: कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी नववा दिवस कसा होता

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या नवव्या दिवशी चार भारतीय बॉक्सर (नीतू, अमित पंघल, निखत झरीन आणि सागर अहलावत) यांनी अंतिम फेरी गाठून भारतासाठी रौप्यपदक निश्चित केलंय. त्याचवेळी रोहित टोकस, मोहम्मद हुसामुद्दीन आणि जस्मिन उपांत्य फेरीत पराभूत होऊन कांस्यपदक जिंकलंय. 

पार्श्वभूमी

CWG 2022 day 10 Live Updates: इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेचा आज दहावा दिवस आहे. भारताची महिला बॉक्सर निकहत झरीन सुवर्णपदक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. कॉमनवेल्थ क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळला जाणार आहे. 


भारतीय टेबल टेनिसचा दिग्गज शरथ कमल याच्या नजरा सुवर्णपदक जिंकण्यावर असतील. तो बर्मिंगहॅम 2022 मध्ये जी साथियानसोबत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत आणि श्रीजा अकुलासोबत मिश्र दुहेरी स्पर्धेत खेळताना दिसेल. वर्ल्ड चॅम्पियन निखत जरीन तिच्या पहिल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत पदकासाठी मैदानात उतरणार आहे. तिचा सहकारी बॉक्सर अमित पंघल आणि दोन वेळची युवा विश्वविजेती नीतू घंगास देखील सुवर्णपदकासाठी लढणार आहेत.


उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागलेल्या महिला हॉकी संघाची नजर आता न्यूझीलंडविरुद्ध कांस्यपदक जिंकण्याकडं असेल. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि चिराग शेट्टी-सात्विकसाईराज रँकीरेड्डी आपापल्या सेमीफायनलमध्ये खेळतील.


सामन्यातील विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून कोर्टवर असेल. कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकण्याचं भारतीय शटलर्सचे लक्ष्य असेल. भारतीय स्क्वॉश स्टार दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल यांचं लक्ष्य मिश्र दुहेरीत एकत्रितपणे दुसरे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचे असेल, तर अन्नू राणी, दुती चंद आणि हिमा दास ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये पदकासाठी शर्यतीत असतील.


हे देखील वाचा- 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.