CWG 2022 Day 2 Live Updates: क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Commonwealth Games 2022 Live Updates: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करून दाखवली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Jul 2022 11:11 PM
CWG 2022 Day 2 Live Updates : मीराबाईच पंतप्रधानांनी केलं अभिनंदन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ 2022 मध्ये पहिलं वहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मीराबाईचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाल, 'विलक्षण मीराबाई चानू. तुम्ही पुन्हा एकदा भारताचा अभिमान वाढवला आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून नवा विक्रम रचला याचा प्रत्येक भारतीयाला आनंद आहे. त्याचे यश अनेक भारतीयांना, विशेषत: नवोदित खेळाडूंना प्रेरणा देते."

CWG 2022 Day 2 Live Updates: भारताला पहिलं गोल्ड! मीराबाईने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकलं सुवर्णपदक

भारताची दिग्गज वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu) हीने सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. कॉमनवेल्थमध्ये आज एकाच दिवसातील भारताचं हे तिसरं पदक आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात पदक मिळवलं आहे. 

CWG 2022: भारतानं दुसरं पदक जिंकलं, वेटलिफ्टिंगमध्ये गुरुराज पुजारीला कांस्यपदक 

बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं दुसरं पदक जिंकलंय.  वेटलिफ्टिंगच्या 61 किलो ग्रॉम वजन गटात भारताच्या गुरुराज पुजारीनं 269 वजन उचलत भारतासाठी कांस्यपदक जिंकलंय. याआधी संकेत सरगरनं वेटलिफ्टिंगच्या 55 किलोग्रॉम वजन गटात रौप्यपदक जिंकून भारताला पहिलं पदक मिळवून दिलंय. 


 

CWG 2022 Day 2 Live Updates: श्रीहरी नटराजची फायनलमध्ये धडक, पदकाच्या दिशेने यशस्वी वाटचाल

स्विमिंगमध्ये भारताच्या श्रीहरी नटराजने 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेच्या फायनलमध्ये जागा मिळवली आहे. त्यामुळे भारताला आणखी एक पदक मिळण्याच्या आशा वाढल्या आहेत. त्याने सेमीफायनलमध्ये 54.55 सेकंदाचा वेळ घेत सातव्या स्थानावर रहात फायनलमध्ये जागा मिळवली.

CWG 2022 Day 2 Live Updates: भारतीय मिश्र संघानं बॅडमिंटनमध्ये सलग दुसरा सामना जिंकला!

भारताच्या मिश्र संघाची बॅडमिंटनमध्ये चांगली कामगिरी सुरूच आहे. भारतानं पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर 4-0 अशा फरकानं विजय मिळवला. सुमित रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं श्रीलंकेच्या जोडीचा 21-10, 21-13 असा पराभव केला. या विजयासह भारतीय मिश्र संघानं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. भारताचा अजून एक सामना बाकी आहे. भारताला आपल्या गटातील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे.

CWG 2022 Day 2 Live Updates: संकेतच्या कुटुंबात आनंदोत्सव

सांगलीच्या संकेत सरगरने सुवर्ण पदक मिळवल्यानंतर त्याचे आई-वडील, बहीण आणि संकेत यांचे कोच मयूर सिहासने यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला.



CWG 2022 Day 2 Live Updates: एक योगायोग असाही...

भारताने कॉमनवेल्थ स्पर्धेत पहिलं पदक वेटलिफ्टिंगमध्ये ते देखील रौप्य पदक मिळवलं आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी पार पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्येही भारताने पहिलं पदक हे रौप्यच मिळवलं होतं आणि ते देखील वेटलिफ्टिंगमध्येच. मीराबाई चानूने ही कमाल केली होती. तर आज महाराष्ट्राच्या संकेत सरगरने ही कमाल केली आहे.

CWG 2022 Day 2 Live Updates: कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं पहिलं पदक जिंकलं, वेटलिफ्टिंग स्पर्धेत संकेत सरगरनं दाखवला दम

भारताचा वेटलिफ्टर संकेत सरगरनं कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकलंय. या विजयासह बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत पहिलं पदक जिंकलंय.

CWG 2022 Day 2 Live Updates: भारत आणि माल्टा यांच्यातील लॉन बॉल सामना बरोबरीत सुटला 

भारत आणि माल्टा यांच्यात लॉन बॉल्समध्ये खेळलेला सामना बरोबरीत सुटला. दोन्ही संघांनी 16-16 गुण मिळवले. हा सामना पुरुषांच्या तिहेरी गटाचा होता. 

CWG 2022 Day 2 Live Updates: कॉमनवेल्थमच्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचं दमदार प्रदर्शन, श्रीलंकेच्या निलुका करुणारत्नेविरुद्ध 2-0 नं विजय नोंदवला

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने श्रीलंकेच्या निलुका करुणारत्नेचा 2-0 असा पराभव केला. लक्ष्यने पहिला गेम 21-18 आणि दुसरा गेम 21-5 असा जिंकला.

CWG 2022 Day 2 Live Updates: बॅडमिंटन मिश्र सांघिक स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर विजय

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या मिश्र सांघिक स्पर्धेत भारताच्या साईराज रँकीरेड्डी आणि मचिमंदा पोनप्पा जोडीनं उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. या सामन्यात भारतानं श्रीलंकेला 2-0  नं नमवलं. 


 

CWG 2022 Day 2 Live Updates: बॅडमिंटन मिश्र सांघिक स्पर्धेत भारत- श्रीलंका आमने सामने

बॅडमिंटनच्या मिश्र सांघिक स्पर्धेत भारत श्रीलंकेविरुद्ध खेळत आहे. मच्छिमंदा पोनप्पा आणि सात्विक साईराज रँकीरेड्डी भारताकडून खेळत आहेत. 

CWG 2022 Day 2 Live Updates: लॉन बॉल्समध्ये भारताची स्पर्धा माल्टासोबत सुरू, टीम इंडियाची आघाडी

लॉन बॉल्सच्या पुरुषांच्या तिहेरी गटात भारत माल्टाविरुद्ध खेळत आहे. टीम इंडिया मोठ्या आघाडीसह खेळत आहे. नवनीत सिंग, मृदुल बोरगोहेन आणि चंदन कुमार सिंग भारतासाठी आपली ताकद दाखवत आहेत.

CWG 2022 Day 2 Live Updates: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतील दुसऱ्या दिवसाचे भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अनेक भारतीय खेळाडू आपली ताकद दाखवतील. या सर्वांचे वेळापत्रक तुम्ही येथे पाहू शकता. 






 


 

CWG 2022 Day 2 Live Updates: कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 च्या दुसऱ्या दिवशीचे लाईव्ह अपडेट्स


नमस्कार, आज कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा दुसरा दिवस आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अनेक भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताला जलतरण आणि वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळण्याची अपेक्षा आहे. कॉमनवेल्थ गेम्सशी संबंधित अपडेट्स तुम्ही येथे वाचू शकता. आमच्याशी कनेक्ट राहिल्याबद्दल धन्यवाद.  

पार्श्वभूमी

Commonwealth Games 2022 Live Updates: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करून दाखवली आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी भारताला पदकाची आशा आहे. भारताचे अनेक खेळाडू चांगली कामगिरी करू शकतात. दुसऱ्या दिवशी दुपारी 1.30 वाजल्यापासून भारतीय बॅडमिंटन संघ श्रीलंकेविरुद्ध सामना खेळणार आहे. तर, संकेत महादेव आणि गुरुराजा वेटलिफ्टिंगमध्ये नशीब आजमावतील. भारताचा टेबल टेनिस संघ दुपारी 2 पासून गयाना विरुद्ध सामना खेळेल. महिला गटाची ही स्पर्धा असेल. तर पुरुष संघ उत्तर आयर्लंडविरुद्ध सामना खेळणार आहे.


मीराबाई चानूकडून दमदार कामगिरीची अपेक्षा
कुशाग्र रावतनं कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतासाठी जलतरणात उत्कृष्ट कामगिरी केली. दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजल्यापासून तो 200 मीटर फ्रीस्टाइलमध्ये आपले कौशल्य दाखवेल. तर बॉक्सिंगमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. मीराबाई चानूकडूनही वेटलिफ्टिंगमध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. महिलांच्या 55 ​​किलो गटात ती नशीब आजमणार आहे. 


भारतीय महिला हॉकी संघ आणि बॅटमिंटन स्पर्धा कधी?
भारताची महिला हॉकीची लढत वेल्सशी होणार आहे. हा सामना रात्री 11.30 पासून होईल. तर बॅडमिंटनमध्ये मिश्र संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळणार आहे. हा सामना रात्री 11.30 पासून सुरु होईल. लॉन बॉलमध्ये तानिया चौधरीकडून पदकाची आशा असेल.


पदतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर
कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 16 सुवर्ण पदकांसह 48 पदके पणाला लागली होती. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियानं 8 सुवर्णांसह 16 पदके जिंकली आहेत. ऑस्ट्रेलिया सध्या पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यजमान इंग्लंड दोन सुवर्ण आणि एकूण 9 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.


हे देखील वाचा-


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.