Ronaldo and Salman Khan Viral Video : क्रीडा आणि मनोरंजनाच्या जगात अनेक घडामोडी घडत असतात. खेळाडू आणि मनोरंजन जगतातील कलाकार मंडळी एकत्र आल्यावर हा क्षण काही वेगळाच असतो. हे क्षण चाहत्यांच्या मनावरही वेगळी छाप पाडून जातात. सध्या असा एक क्षण चाहत्यांना अनुभवायला मिळाला आहे. स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि बॉलिवूड स्टार सलमान खान यांनी एकाच कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


रोनाल्डो आणि सलमान खान एकत्र


सध्या सोशल मीडियावर रोनाल्डोने आणि सलमान खान यांचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये रोनाल्डोची लोकप्रियता सलमान खानवर भारी पडताना दिसत आहे. या कार्यक्रमात रोनाल्डोने आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत स्पॉटलाइट शेअर केला. पण, एका व्हायरल व्हिडीओमध्यो रोनाल्डोनं सलमान खानकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे.


रोनाल्डोच्या समोर सलमान खानचा 'स्टारडम' फिका


फुटबॉल आयकॉन ख्रिस्तियानो रोनाल्डोने आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान एकाच कार्यक्रमात दिसले. दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील दोन सर्वात प्रभावशाली व्यक्ती एकाच ठिकाणी दिसल्यावर चाहत्यांचा नजरा त्याकडे खिळल्या. सौदी अरेबियातील एका बॉक्सिंग सामन्यात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि फुटबॉलस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने यांनी हजेरी लावली. याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. 


VIDEO तुम्ही पाहिला का?






रोनाल्डोचं 'भाईजान'कडे दुर्लक्ष?


दरम्यान, बॉक्सिंग सामन्याच्या व्हायरल व्हिडीओमध्ये, ख्रिस्तियानो रोनाल्डोवर सर्वांच्या नजरा असल्याचं दिसून येत आहे. त्याने इतर सेलिब्रिटींशी संवाद साधला, यावेळी रोनाल्डो सलमान खानच्या बाजूने गेला पण, सलमानकडे त्याचं लक्ष गेलं नाही. रोनाल्डोने सौदीतील शेख आणि इतर दिग्गजांसोबत संवाद साधला, त्यांच्यासोबत हातमिळवणी आणि गळाभेटही घेतली. पण, यावेळी सलमान खान एका बाजूला उभा होता.


व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?


दरम्यान, या व्हायरल फोटो आणि व्हिडीओनंतर सलमान आणि रोनाल्डो यांचा आणखी एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये सलमान खान आणि रोनोल्डो एकत्र बोलतान दिसत आहेत. त्यामुळे सलमानला रोनाल्डोनं इग्नोर केल्याच्या चर्चा भाईजानच्या चाहत्यांनी फेटाळल्या आहेत.






सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया


सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत. ''रोनाल्डोच्या लोकप्रियतेने सलमान खान सारख्या बॉलीवूड सुपरस्टारची चमक कशी फिकी पडली'', असं म्हणत नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करत आहेत. "कॅमेरामन फक्त रोनाल्डोला ओळखत होता, त्यामुळे तो फक्त रोनाल्डोवर लक्ष केंद्रित करत होता" असं दुसऱ्या एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे.