नवी दिल्ली : टीम इंडियाचा युवा खेळाडू जयंत यादवच्या वडिलांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. दिल्लीतील एका रुग्णालयात जयसिंह यादव यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अनेक दिवसांपासून किडनी आणि लीव्हरच्या आजाराने त्रस्त होते.

जयसिंह यादव हे प्रथम श्रेणी क्रिकेटर होते. आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि जयसिंह यांचे भाऊ योगेंद्र यादव यांनी निधनाची माहिती दिली.

जयंत यादवने गेल्या वर्षीच टीम इंडियात पदार्पण केलं आहे. भारताकडून त्याने 4 कसोटी सामने आणि एका वन डेचं प्रतिनिधीत्वही केलं आहे. कसोटीत नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना जयंत यादवने शतक ठोकलं होतं.

नवव्या क्रमांकावर खेळताना शतक ठोकणारा जयंत यादव जगातील दुसराच खेळाडू आहे. मात्र सध्या जयंत यादव भारतीय संघातून बाहेर आहे.