मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज युझवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर, युट्यूब धनश्री वर्मा 2020 मध्ये विवाहबंधनात अडकले. सोशल मीडियावर त्यांच्या विवाहसोहळ्याची बरीच चर्चाही झाली. आता पुन्हा एकदा त्यांचा विवाहसोहळा चर्चेत आला आहे. किंबहुना युझी आणि त्याची पत्नी धनश्री यांच्या नात्यानं सर्वांचीच मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत. निमित्त आहे ते म्हणजे त्यांचा वेडिंग व्हिडीओ. 

Continues below advertisement


नुकताच या सेलिब्रिटी जोडीनं सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील काही खास क्षण एकत्रित केल्याचा व्हिडीओ सर्वांच्या भेटीला आणला. या व्हिडीओमध्ये लग्नसोहळ्यातील धमाल पाहायला मिळत आहे. 


Video | नवीकोरी Lamborghini कार्तिक आर्यनच्या हाती येताच झाला स्फोट


युझवेंद्र चहल हा त्याच्या दिलखुलास स्वभासाठी आणि विनोदी अंदाजासाठीही ओळखला जातो. त्याचा हाच अंदाज व्हिडीओची सुरुवात करुन जातो, ओ जी शादी के बाद सबकी लाईफ है रिस्की, असं म्हणताना युझवेंद्रचा अंदाज आणि त्यानंतर सुरु असणारी त्याची विनोदी कॉमेंट्री पाहताना, ऐकताना आपल्याही चेहऱ्यावर हसू येतं. 


एकिकडे युझीची विनोदी फिरकी सुरु असतानाच त्याच्यावर धनश्रीही दमदार फटकेबाजी करताना दिसत आहे. काहीसा खोडकर, मजेशीर असा दोघांचाही स्वभाव या व्हिडीओच्या निमित्तानं सर्वांनाच पाहण्याची संधी मिळाली आहे. लग्नसोहळा म्हटलं की पाहुण्यांची गर्दी, मित्रमंडळींचा कल्ला आणि न शमणारा उत्साह हेच चित्र पाहायला मिळतं. अगदी या साऱ्याचाच मिलाप या वेडिंग व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 







गुरुग्राम येथे अतिशय छोटेखानी समारंभात या दोघांनी एका नव्या जीवनाची सुरुवात केली. समारंभ छोटेखानी असला तरीही त्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद मात्र त्यांनी मनमुरादपणे लुटला. परंपरा आणि विधी इथपासून आपल्या जीवनातील खास व्यक्तीच्या चेहऱ्यावर आलेलं स्मितहास्य पाहताना नकळतच मनाला मिळणारा दिलासा आणि सुख युझवेंद्र आणि धनश्री या दोघांच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.