मुंबई : क्रिकेटपटू (Virat Kohli) विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लहान मुलीचं स्वागत केलं. अनुष्कानं मुलीला जन्म दिल्यानंतर विराटनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह ही गोड बातमी शेअर केली. ज्यानंतर या सेलिब्रिटी जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. विराट आणि अनुष्काच्या जीवनात सध्या एका नव्या पर्वाचीच सुरुवात झाली आहे.


एका नव्या जबाबदारीसह ते पुढील जीवन व्यतीत करणार आहेत, महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत. अशात विराटनं अत्यंच महत्त्वाचं पाऊल उचलत सर्वांची मनं जिंकली आहेत. जीवनात आलेल्या या वळणाची ग्वाही त्यानं यापूर्वीच दिली. पण, आता अनोख्या अंदाजात त्यानं स्वत:ची नवी ओळख सर्वांसमोर आणली आहे. ही ओळख म्हणजे एका मुलीचे वडील असण्याची.


ट्विटर अकाऊंटवर असणाऱ्या बायोमध्ये त्यानं असं काही लिहिलं आहे, जे सर्वांच्याच मनाचा ठाव घेत आहे. 'A proud husband and father' असं लिहित त्यानं वडील आणि पती, या दोन्ही नात्यांना सन्मान देऊ केला आहे. त्याच्या या अंदाजामुळं अनुष्कालाही कमालीचा आनंद झाला असणार यात शंका नाही. दरम्यान, मुलीच्या जन्मामुळं सध्या आनंदाची उधळण होणाऱ्या या जोडीनं अद्यापही मुलीचं छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केलेलं नाही. किंबहुना माध्यमांनाही विनंती करत मुलीचं छायाचित्र न घेण्याचं आवाहन करत आपल्या खासगी जीवनातील गोपनीयेता आदर करण्याची विनंती केली आहे.



विराट आणि अनुष्का 2017 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्याआधीपासूनच सेलिब्रिटी वर्तुळात त्यांच्या नात्याची चर्चा होती. लग्नानंतरही ही जोडी कायमच मोस्ट हॅपनिंग कपल्सच्या यादीत अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळाली. जोडीदाराच्या यशाचा आनंदसाजरा करण्यापासून आव्हानाच्या काळाता एकमेकांचा आधार होऊन उभं राहण्यापर्यंत वेळोवेळी विरुष्कानं #CoupleGoals दिले आहेत.



Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Live Updates