मुंबई : गुजरातच्या सौराष्ट्र प्रांतातलं राजकोट शहर त्यांचा लाडका क्रिकेटर रवींद्र जाडेजाच्या लग्नासाठी सज्ज झालं आहेे. टीम इंडियाचा अष्टपैलू आणि आयपीएलमधल्या गुजरात टीमचा हा लायन आज राजकोटमध्ये त्याची प्रेयसी रिवा सोळंकीशी विवाहबद्ध होत आहे.


 

रवींद्र आणि रिवाच्या लग्नाचा थाट इतका मोठा आहे की, एखाद्या शाही विवाहसोहळ्याला शोभाव्यात अशा परंपरा आणि विधी त्यांच्या लग्नानिमित्त दिसून येत आहेत. रवींद्र जाडेजाला त्याच्या सासरच्या मंडळींकडून म्हणजे सोळंकी कुटुंबीयांकडून 95 लाख रुपयांच्या ऑडीची मिळालेली भेट आपण आधीच पाहिली होती.

 

जाडेजाच्या लग्नानिमित्त शनिवारी तर बँडवाल्यावर दौलतजादा झाल्याचंही पाहायला मिळालं. राजकोटच्या रस्त्यावरून वऱ्हाडी वाजतगाजत निघाले. फटाक्यांची आतषबाजीही झाली. पण या धामधुमीत रवींद्र जाडेजा आणि त्याची वाग्दत्त वधू रिवा यांचा चेहरा कुठंच दिसला नाही म्हणून चाहत्यांची निराशा झाली.


संंबंधित बातम्या :


लग्नापूर्वीच सासरच्यांकडून जाडेजाला 95 लाखांची ऑडी भेट


 

पाहा व्हिडीओ