नाताळ साजरा केल्यामुळे क्रिकेटपटू मोहम्मद कैफ ट्रोल
एबीपी माझा वेब टीम | 26 Dec 2017 09:09 PM (IST)
कैफने ख्रिस्ती सण साजरा केल्यामुळे नाराज झालेल्या फॉलोवर्सनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं आहे.
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. नाताळच्या शुभेच्छा देत फोटो पोस्ट केल्यामुळे कैफवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. मोहम्मद कैफने पत्नी आणि मुलांसोबत ख्रिसमस साजरा केल्यानंतर फोटो ट्वीट केला आहे. यामध्ये कैफने सांताक्लॉजची टोपी घातली आहे, तर बाजूला ख्रिसमस ट्री दिसत आहे. 'मेरी ख्रिसमस! सर्वत्र प्रेम आणि शांतता नांदू दे.' अशा शुभेच्छा त्याने दिल्या आहेत. कैफने ख्रिस्ती सण साजरा केल्यामुळे नाराज झालेल्या फॉलोवर्सनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं आहे. कैफने इस्लाम धर्माची परंपरा धुडकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.