मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं बहुतांशी श्रेय हे संघातील खेळाडूंसोबतच संघाच्या नेतृत्वालाही दिलं जातं. ज्यामध्ये येणाऱ्या नावांमध्ये अर्थातच ओघाओघानं (M S Dhoni) महेंद्र सिंह धोनी, याचंही नाव येतंच.


माही, कॅप्टन कूल, धोनी अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूनं 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कायमचा रामराम ठोकला. सक्रिय आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून धोनीनं निवृत्ती घेतली असली तरीही त्याच्या नावाभोवती असणारं वलय आणि क्रीडारसिकांच्या मनात असणारं त्याचं स्थान आजही अबाधित आहे. माही निवृत्तीनंतर नेमका करणार तरी काय, असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन गेला.


इथं प्रश्नांची रिघ लागलेली असतानाच माहीनं मात्र त्याच्या निवृत्तीनंतरच्या जीवनाता बेत फार आधीच आखल्याचं पाहायला मिळत आहे. एकिकडे विविध जाहिरातींसाठी काम करण्याचं धोनी सत्र सुरु असतानाच त्यानं कुक्कुटपालन व्यवसायात उडी घेतली. मागील वर्षी रांची येथील फार्महाऊसवर त्यानं जवळपास 2 हजार कडकनाथ प्रजातीत्या कोंबड्यांचं पालन करण्याचा निर्णय घेतला. आता हाच माही भाज्यांची निर्यात करण्याचा व्यवसायही सुरु करणार असल्याचं म्हटलं जात आहे.


Video | पहिल्याच जाहिरातीत स्टार खेळाडूसह झळकली धोनीची मुलगी झिवा


रांची येथीस सँबो गावी असणाऱ्या रिंग रोड परिसरात धोनचं फार्महाऊस 43 एकर भूखंडावर उभं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तिथं तो कोबी, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, फरस्बी आणि इतरही भाज्यांची लागवड जवळपास 10 एकरांच्या भूखंडावर करत आहे. रांचीच्या स्थानिक बाजारपेठेत त्याच्या शेताती कोबी आणि टोमॅटोला चांगली मागणी असल्याचं म्हटलं जात आहे.


इतकंच नव्हे, तर आता फार्म फ्रेश एजेन्सीनं थेट दुबईमध्ये धोनीच्या शेतातील भाजी विकण्याची व्यवस्थाही केल्याचं म्हटलं जात आहे. हा व्यवहार आता शेवटच्या टप्प्यात असल्याची बाब समोर येत आहे. ही एजेन्सी फक्त धोनीच्या शेतातील भाजीची युएईमध्ये विक्री करण्याची जबाबदारी नव्हे तर, आखाती राष्ट्रांमध्ये येथील फळंही विकण्याची जबाबदारी घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार झारखंड कृषी विभागानं ही भाजी आणि इतर गोष्टी युएईपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे.



यापूर्वीच धोनीच्या शेतातील सेंद्रीय भाज्यांची विक्री रांचीत सुरु....


रांचीतील बाजारपेठेत धोनीच्या शेतात उगवलेल्या सेंद्रीय भाज्यांची विक्री सुरु झाली असून, त्याला चांगली पसंतीही मिळत आहे. सेंद्रीय असूनही माहीच्या शेतातील भाज्यांचे दरही खिशाला परवडतील असेच आहेत. किंबहुना हे दर इतर भाजी विक्रेत्यांपेक्षा कमीच असल्याचं म्हटलं जात आहे.


क्रिकेटचं मैदान गाजवणारा हाच माही आता खऱ्या अर्थानं अनेकांची भूक भागवत अनोख्या मार्गानं सर्वांचीच मनं जिंकत आहे आणि त्याचं निवृत्तीनंतरचं जीवन तितक्याच सुरेखपणे व्यतीत करत आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे.