जोहान्सबर्ग : भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये एका आगळ्यावेगळ्या विक्रमाची नोंद केली. जोहान्सबर्गच्या या सामन्यात भुवनेश्वरनं पाच विकेट्स घेत क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये एका डावात पाच विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
भुवनेश्वरच्या या विक्रमी कामगिरीनं पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 28 धावांनी विजय मिळवला. याआधी भुवनेश्वरनं कसोटीत चार वेळा आणि एका वन डेत पाच फलंदाजांना माघारी धाडण्याची कामगिरी केली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याआधी केवळ पाच गोलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे. यात लसिथ मलिंगा, अजंता मेंडिस, उमर गुल, इमरान ताहीर आणि टिम साउथी यांचा समावेश आहे.
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा भन्नाट विक्रम
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
19 Feb 2018 11:42 PM (IST)
भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये एका आगळ्यावेगळ्या विक्रमाची नोंद केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -