IND vs ZIM : बार्बाडोसमध्ये टीम इंडियाने झेंडा फडकवत टी20 विश्वचषकावर नाव कोरले. त्यानंतर आता युवा खेळाडूंसोबत टीम इंडिया झिम्बॉब्वे दौऱ्यावर जाणार आहे. 6 जुलैपासून भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यामध्ये टी20 मालिका पार पडणार आहे. त्यासाठी टीम इंडियाची धुरा युवा शुभमन गिल याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी याआधीच भारतीय संघाची निवड करण्यात आली होती. आता झिम्बॉब्वेने आपली 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. सिकंदर रजा याच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. यजमान झिम्बॉब्वेने आपल्या ताफ्यात अनेक युवा खेळाडूंना स्थान दिलेय. संघाची धुरा 38 वर्षीय सिकंदर रझा याच्या खांद्यावर असेल.
युवा खेळाडूंना संधी -
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने भारताविरूद्धच्या पाच सामन्याच्या मालिकेसाठी काही अनुभवी खेळाडूंना संघात स्थान दिलेय. त्यामध्ये तेंडाई चतारा, वेस्ली माधवायर, ब्रँडन मावुता, डिओन मायर्स, इनोसंट कैया आणि मिल्टन शुंबा यांचा समावेश आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर 5 नवीन खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे. क्रेग इर्विन आणि शॉन वॉल्टमॅनसारखे अनुभवी खेळाडू वगळण्यात आलेय.
जिम्बाब्वेच्या ताफ्यात कोण कोण ?
सिकंदर रजा (कर्णधार), अकरम फराज, बॅनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, तेंदई चतारा, ल्यूक जोंगवे, इनोसेंट काइया, क्लाइव मडांडे, वेस्ली मधेविरे, तदिवनाशे मारुमानी, वेलिंग्टन मसाकाद्जा, ब्रँडन मावुता, ब्लेसिंग मुजरबानी, डायोन मायर्स, अंतुम नकवी, रिचर्ड नगारवा, मिल्टन शुम्बा
टीम इंडियाचे 15 शिलेदार
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकु सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे
Ꮪhubman Gill (Captain), Yashasvi Jaiswal, Ruturaj Gaikwad, Abhishek Sharma, Rinku Singh, Sanju Samson (WK), Dhruv Jurel (WK), Nitish Reddy, Riyan Parag, Washington Sundar, Ravi Bishnoi, Avesh Khan, Khaleel Ahmed, Mukesh Kumar, Tushar Deshpande.
झिम्बॉब्वे दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक - |
|||||
Sr. No. |
Date |
Day |
Match |
Venue |
Time |
1st T20I |
06-जुलै 2024 |
Saturday |
जिम्बाब्वे vs टीम इंडिया |
हरारे स्पोर्ट्स क्लब |
1:00 PM (4:30 PM IST) |
2nd T20I |
07-जुलै 2024 |
Sunday |
जिम्बाब्वे vs टीम इंडिया |
हरारे स्पोर्ट्स क्लब |
1:00 PM (4:30 PM IST) |
3rd T20I |
10-जुलै 2024 |
Wednesday |
जिम्बाब्वे vs टीम इंडिया |
हरारे स्पोर्ट्स क्लब |
1:00 PM (4:30 PM IST) |
4th T20I |
13-जुलै 2024 |
Saturday |
जिम्बाब्वे vs टीम इंडिया |
हरारे स्पोर्ट्स क्लब |
1:00 PM (4:30 PM IST) |
5th T20I |
14-जुलै 2024 |
Sunday |
जिम्बाब्वे vs टीम इंडिया |
हरारे स्पोर्ट्स क्लब |
1:00 PM (4:30 PM IST) |