Yashasvi Jaiswal Hospitalised News : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्याला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील मुंबई विरुद्ध राजस्थान या सामन्यानंतर घडली. सामन्यानंतर जैस्वालला पोटात दुखत होते. त्यानंतर त्याला तातडीने पुण्यातील आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला अॅक्यूट गॅस्ट्रोएन्टेरायटिस झाल्याचे निदान केले आहे. रुग्णालयात त्याचे अल्ट्रासाऊंड (USG) आणि सीटी स्कॅन करण्यात आले असून सध्या त्याच्यावर IV द्वारे उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
सामन्यादरम्यान अस्वस्थ दिसला जैस्वाल
सुपर लीगमधील राजस्थानविरुद्धच्या सामन्यात जैस्वाल शारीरिकदृष्ट्या त्रस्त दिसत होता. प्रकृती ठीक नसतानाही तो मैदानात उतरला, मात्र आपल्या नेहमीच्या लयीत दिसला नाही. त्याने 16 चेंडूत फक्त 15 धावा केल्या. तरीही मुंबई संघाने 217 धावांचे मोठे लक्ष्य यशस्वीरीत्या पार केले. या विजयाचा हिरो ठरला अजिंक्य रहाणे आणि सरफराज खान. सरफराज खानने अवघ्या 22 चेंडूत 73 धावांची तुफानी खेळी करत सामना रंगतदार केला, तर रहाणेने 72 धावांची दमदार इनिंग खेळली.
मुंबई स्पर्धेतून बाहेर, जैस्वालला रिकव्हरीसाठी वेळ
या विजयाच्या बावजूद मुंबई संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मात्र या स्पर्धेत जैस्वालची वैयक्तिक कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने 3 सामन्यांत 48.33 च्या सरासरीने आणि 168.6 च्या स्ट्राइक रेटने 145 धावा केल्या.
सध्या जैस्वाल भारतीय टी20 संघाचा भाग नाही आणि त्याचा कोणताही आंतरराष्ट्रीय सामना नाही. त्यामुळे त्याला पूर्णपणे सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे. जैस्वाल सध्या वनडे आणि कसोटी संघाचा सदस्य आहे.
हे ही वाचा -