WTC Points table : ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर कसोटी सामन्यात (IND vs AUS 1st Test) एक डाव आणि 132 धावांनी जिंकून भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC) च्या गुणतालिकेत आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियन संघ 70.83 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर भारतीय संघाला आता 61.66 गुणांची टक्केवारी मिळाली आहे. या विजयासह, भारतीय संघाने आता ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या या WTC फायनलच्या सामन्यात आपलं स्थान निश्चित करण्याच्या दिशेने आणखी एक यशस्वी पाऊल टाकलं आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या यंदाच्या आवृत्तीच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघाला ही मालिका किमान 3-1 अशा फरकाने जिंकावी लागेल. यासह, भारतीय संघाची विजयी टक्केवारी 61.92 पर्यंत पोहोचू शकते. ज्यामुळे मार्च महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंका या 2 सामन्यांची कसोटी मालिकेवर भारताला अवंलंबून राहावे लागणार नाही. दुसरीकडे, भारतीय संघाने आता ही मालिका 3-0 किंवा 4-0 ने जिंकली तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानी पोहचेल.
संघ | विजय | पराभव | अनिर्णीत | एकूण गुण | विजयी टक्केवारी |
1. ऑस्ट्रेलिया | 10 | 2 | 4 | 136 | 70.83 |
2. भारत | 9 | 4 | 2 | 111 | 61.67 |
3.श्रीलंका | 5 | 4 | 1 | 64 | 53.33 |
4. दक्षिण आफ्रीका | 6 | 6 | 1 | 76 | 48.72 |
5. इंग्लंड | 10 | 8 | 4 | 124 | 46.97 |
6. वेस्ट इंडीज | 4 | 5 | 2 | 54 | 40.91 |
7. पाकिस्तान | 4 | 6 | 4 | 64 | 38.10 |
8. न्यूझीलंड | 2 | 6 | 3 | 36 | 27.27 |
9. बांगलादेश | 1 | 1 | 10 | 16 | 11.11 |
भारताचा दमदार विजय
भारतानं आजचा हा सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकानं जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात सुरुवातीपासून भारतानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. ज्यात ऑस्ट्रेलियाला 177 धावांत सर्वबाद करुन भारतानं पहिल्या डावात 400 धावा करत 223 धावांची आघाडी घेतली. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 91 धावांत आटोपत सामना 1 डाव आणि 132 धावांनी जिंकला आहे. भारताकडून रवींद्र जाडेजाने दोन्ही डावात मिळून 7 तर अश्विननं दोन्ही डावांत मिळून 8 विकेट्स घेतल्या. याशिवाय कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) 120 तर अक्षर पटेल 84 आणि रवींद्र जाडेजा 70 यांनी सर्वाधिक धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकीपटू टॉड मर्फीने एका डावातच 7 विकेट्स घेत चांगली कामगिरी केली पण अखेर सामना भारतानं मोठ्या फरकाने जिंकला आहे.
हे देखील वाचा-