Rishabh Pant Update : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. यानंतर गेल्या महिन्यात पंतच्या गुडघ्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ज्यानंतर हळूहळू पंतची प्रकृती सावरत असून त्याने शुक्रवारी (10 फेब्रुवारी) आपल्या बरे होण्याबाबत ट्वीट करून मोठी माहिती दिली आहे. त्याने दोन फोटोही पोस्ट केले असून या फोटोंवर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात त्याने पंतच्या बरे होण्याची प्रार्थना देखील केली आहे.
ऋषभ पंतने सोशल मीडियावरील (Rishabh Pant Social Media Post) त्याच्या पोस्टमध्ये ट्वीट केलेल्या दोन फोटोमध्ये तो क्रॅचच्या मदतीने चालताना दिसत आहे. पंतने आपल्या ट्वीटमध्ये फोटो (Rishabh Pant Latets Photo) पोस्ट केले आणि लिहिले, 'एक पाऊल पुढे, एक पाऊल मजबूत आणि एक पाऊल चांगले.' या ट्विटला उत्तर देताना मोहम्मद सिराजने लिहिले की, ''मित्रा, मला तुझी खूप आठवण येते, तू लवकर बरा हो, हीच माझी प्रार्थना आहे. आमेन.'
पाहा मोहम्मद सिराजची पोस्ट-
रुरकीला जाताना झाला होता अपघात
ख्रिसमस सेलिब्रेट करून दुबईहून परतलेला ऋषभ पंत 30 डिसेंबरला दिल्लीहून रुरकीला जात होता. यादरम्यान त्याची कार मोहम्मदपूर जतजवळ दुभाजकाला धडकली आणि आग लागली. या भयानक अपघातात पंत गंभीर जखमी झाला. त्याला त्वरीत प्रथमोपचारासाठी रुरकी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पंतला (Pant) डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. कार अपघातात ऋषभ पंतच्या कपाळावर दोन कट झाल्याची माहिती बीसीसीआयने मॅक्स हॉस्पिटलला दिली होती. त्याच्या उजव्या पायाचा लिगामेंटलाही गंभाररित्या इजा झाली होती. याशिवाय पाय, पाठ, अंगठा आणि मनगटात खोलवर जखम आहे. आता लिगामेंट ऑपरेशनमुळे पंत 6 ते 9 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट मालिकेशिवाय तो आयपीएल 2023 मधूनही बाहेर राहू शकतो. जर त्याने तंदुरुस्त होण्यासाठी अधिक वेळ घेतला तर पंत 2023 च्या विश्वचषकातूनही बाहेर राहू शकतो.
हे देखील वाचा-