WTC Final 2023: भारतीय क्रिकेट संघ 2023 च्या सर्वात मोठ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) च्या विजेतेपदाच्या सामन्यात रोहित सेना ऑस्ट्रेलियाशी (IND vs AUS) सामना करेल. भारतीय क्रिकेट संघ पॉईंट टेबलमध्ये दुसरं स्थान मिळवून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. विजेतेपदाचा सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांसमोर परिस्थितीशी जुळवून घेण्याचं आव्हान असेल. दोन्ही संघांनी विजेतेपद मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेला हा सामना कधी होणार? कुठे खेळवला जाणार? आणि आम्ही त्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहु शकणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवा फक्त एका क्लिकवर... 


कुठे खेळवली जाणार टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात WTC चा अंतिम सामना? 


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. 


टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC फायनल कधी? 


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून रोजी, बुधवारी WTC फायनल खेळवली जाणार आहे. 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना किती वाजता सुरू होणार? 


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात येणारा सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. टॉस 2.30 वाजता होईल. 


WTC फायनलचं लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहू शकता? 


टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचं लाईव्ह टेलिक्साट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. 


WTC फायनलची लाईव्ह स्ट्रिमिंग कोणत्या OTT प्लेटफॉर्मवर होईल? 


आयपीएलच्या सामन्यांचं जियो सिनेमावर स्ट्रीमिंग करण्यात आलं होतं. परंतु, हा फायनल सामना डिज्ने प्लस हॉटस्टारवर पाहाता येणार आहे. 


दोन्ही संघांचे संभाव्य सामने : 


टीम ऑस्ट्रेलिया 


पॅट कमिंस (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स केरी (विकेटकिपर), कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जोश इंगलिस (विकेटकिपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, टॉड मर्फी, स्टीव स्मिथ (उपकर्णधार), मिशेल स्टार्क, डेविड वार्नर 


टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


WTC Final Rahul Dravid: ICC ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियावर दबाव? WTC फायनलपूर्वी हेड कोच द्रविड म्हणतो...