WPL 2025 Auction Live Streaming : सौदी अरेबिया येथे आयपीएल 2025 मेगा ऑक्शन पार पडला. या मेगा ऑक्शनमध्ये अनेक रेकॉर्ड्स ब्रेक झाले. आता महिला प्रीमियर लीग (WPL) च्या खेळाडूंचा लिलाव होणार आहे. अंतिम यादीत एकूण 120 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. WPL लिलाव 15 डिसेंबर 2024 रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. यापूर्वी दोनदा लिलाव झाला आहे. आता तिसऱ्यांदा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. पुढील वर्षी एक मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे.


या लिलावात एकूण 120 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यामध्ये 91 भारतीय खेळाडू आहेत, तर 29 विदेशी खेळाडू आहेत, ज्यात 3 असोसिएट राष्ट्रांचे आहेत. यावेळी, भारतातील 82 अनकॅप्ड खेळाडूंचा लिलावात समावेश करण्यात आला आहे, तर 8 अनकॅप्ड परदेशी खेळाडू देखील लिलावाचा भाग आहेत. पण 5 ​​संघांमध्ये केवळ 19 जागा बाकी आहेत. विदेशी खेळाडूंसाठीही 5 जागा रिक्त आहेत. त्यामुळे हा लिलाव खूपच छोटा असेल. रविवारी दुपारी 3 वाजल्यापासून बेंगळुरू येथे लिलाव होणार आहे. टीव्हीवर स्पोर्ट्स 18 या चॅनेल महिला प्रीमियर लीग 2025 लिलावाचे थेट प्रक्षेपण केल्या जाईल. तर मोबाईलवर Jio Cinema लाइव्ह स्ट्रीमिंग करण्यात येईल. 






ही स्पर्धा 2023 मध्ये सुरू झाली आणि आतापर्यंत दोन हंगाम खेळले गेले आहेत. त्या हंगामातील विजेता संघ मुंबई इंडियन्स होता, तर 2024 चा विजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू होता. या दोन संघांव्यतिरिक्त त्यात दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्सचा समावेश आहे.


WPL लिलावासाठी फक्त तीन खेळाडूंची मूळ किंमत प्रत्येकी 50 लाख रुपये आहे. हे तिघेही विदेशी खेळाडू असून त्यात डिआंड्रा डॉटिन, हीदर नाइट आणि लिझेल ली यांचा समावेश आहे. त्याच वेळी, प्रत्येकी 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत एकूण 17 खेळाडू लिलावात उतरणार आहे. एका खेळाडूची मूळ किंमत 20 लाख रुपये आहे, तर उर्वरित खेळाडू प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या मूळ किमतीने लिलावात येतील. 


हे ही वाचा -


Ind vs Aus 3rd Test : गाबा कसोटीत रोहित शर्मा गंभीरच्या लाडक्याचा करणार गेम? टीम इंडियाच्या प्लेइंग-11मध्ये 'या' खेळाडूची थेट एन्ट्री


Ajinkya Rahane SMAT 2024 : हार्दिक पांड्याच्या संघावर भारी पडली मुंबई! थेट फायनलमध्ये मारली एन्ट्री, अजिंक्य रहाणेचे हुकले शतक