UPW-W vs GG-W, WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेतील 17 व्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्स (Gujrat giants vs UP Warriors) या दोन संघात सामना सुरु असून गुजरात संघानं प्रथम फलंदाजी करत एक दमदार स्कोर उभारला आहे. 178 धावांची मोठी धावसंख्या गुजरातनं उभारली आहे. नाणेफेक जिंकत त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर दयालेन मेहता आणि अॅश्ने गार्डनर या दोघींनी ठोकलेल्या दमदार अर्धशतकामुळं गुजरातनं एक दमदार स्कोर उभारला आहे. आता 179 धावा करण्यासाठी यूपीचा संघ मैदानात उतरत आहे.
सामन्याचा विचार केल्यास सर्वात आधी नाणेफेक जिंकत गुजरात जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीला आलेल्या सोफिया डन्कले आणि लॉरा वूल्वर्डट यांनी चांगली सुरुवात केली. पण 41 धावांवर लॉरा 17 धावा करुन बाद झाली. त्यानंतर सोफिया, हरलीन या देखील अनुक्रमे 23 आणि 4 धावा करुन बाद झाल्या. त्यानंतर मात्र दयालन हेमलता आणि अॅश्ले गार्डनर यांनी एक दमदार भागिदारी उभारली. दयालनने 33 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार ठोकत 57 धावा केल्या. तर अॅश्नेने 39 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार ठोकत 60 धावा केल्या. यूपीकडून पार्श्ववी चोप्रा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर अंजली सर्वानी आणि एक्ल्स्टोन यांनीही एक-एक विकेट घेतली.
युपीचा संघ जिंकू शकतो सामना
179 धावाचं एक मोठं लक्ष युपी संघाला पार करायचं आहे. दरम्यान महिलांच्या आयपीएल 2023 च्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरीमुळे चर्चेत असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला मात दिल्यामुळे यूपी संघाची चर्चा होत असून आता ते हे लक्ष्यही पूर्ण करतील असं वाटत आहे. आतापर्यंतचा विचार केल्यास यूपी संघाने सहापैकी तीन सामन्यात विजय मिळवला असून तीन सामने गमावले आहेत. तर गुजरातने सात पैकी केवळ दोन सामना जिंकले असून 5 सामने गमावले आहेत.
मुंबई-दिल्लीही आमने-सामने
आजच्या दिवसातील दुसर सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 7.30 वाजत होणार आहे. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात हा सामना रंगणार आहे.
हे देखील वाचा-