Babar Azam Is Not Like Virat Kohli : विश्वचषकात पाकिस्तान संघाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. सलग चार पराभवानंतर अखेर त्यांना विजय मिळला. त्यात कर्णधार बाबर आझमची बॅट अद्यापही शांतच आहे. बाबर आझम याला विश्वचषकात अद्याप मोठी कामगिरी करता आलेली नाही. त्यावर त्याच्यावर पाकिस्तानमधूनच टीकेची झोड उडत आहे. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने बाबर आझमला चांगलेच सुनावलेय. त्याशिवाय बाबर आझम याच्यामध्ये विराट कोहलीसारखा दम नाही, असेही वक्तव्य केलेय. मागील काही दिवसांपासून बाबर आझम आणि विराट कोहली यांची सातत्याने तुलना केली जातेय. सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये यावरुन वादही होतो. आता शाहीद आफ्रिदीच्या या वक्तव्यानंतर यामध्ये आणखी भर पडणार आहे. 


एका वृत्तवाहिनीशी क्रिकेटच्या चर्चेत बोलताना शाहीद आफ्रिदीने बाबर आझम याच्या फलंदाजीवर निशाणा साधला. बाबर आझम चांगला खेळाडू आहे. पण तो सामना जिंकवून देऊ शकत नाही. विराट कोहली, केएल राहुल हे आपल्या संघाला सामना जिंकून देतात. पण बाबर आझम चांगला खेळतो, पण सामना जिंकून देत नाही. तो 50-60 धावा काढेल, असेच नेहमी वाटते. पण सामना जिंकून देईल, असे कधीच वाटत नाही, असे आफ्रिदी म्हणाला. 


विश्वचषकात बाबरची बॅट अद्याप शांतच आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबरने सात सामन्यात तीन अर्धशतके ठोकली, पण त्याचा संघाला काहीच फायदा झाला नाही. कारण, बाबर आझमने ज्या सामन्यात अर्धशतके ठोकली, त्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागलाय. यावरुन शाहीद आफ्रिदीने बाबर आझम याच्यावर टीकेची झोड सोडली. शाहीद आफ्रिदीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 






बाबर आझमचे धावा करणं वेगळेय... पण संघाला विजय मिळवून देणाऱ्या धावा आहेत का... हे महत्वाचं आहे. विराट कोहली, केएल राहुल यांच्यासारखे खेळाडे स्वतच्या धावा करतात, आणि संघाला विजय मिळवून देतात, असे आफ्रिदी म्हणाला. 


आफ्रिदी म्हणाला की, बाबर आझमचे आम्हीही सगळे चाहते आहोत. पण वारंवार लोकांना समजावणे कठीम होतेय, की आम्हाला नेमकं हवे काय आहे. बाबर मोठा खळाडू असल्याचे आम्ही मानतो. पण मोठ्या खेळाडूला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवावे लागते. बाबरला पाहून असे वाटायला हवे की, हा सामना जिंकून देईल. पण असे वाटत नाही. हा.. बाबर 50-60 धावा काढेल असे नक्की वाटते.