Sachin Tendulkar Statue at Wankhede Stadium: भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुंबईमधील (Mumbai News) वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झालेय.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते सचिनच्या पुतळ्याचं (Sachin Tendulkar Statue) अनावरण झालं.  यावेळी सचिन तेंडुलकर स्वत: उपस्तित होता.  हा पुतळा तब्बल 22 फूट उंचीचा आहे.

  


क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये सचिनच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आले.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सचिनच्या पुतळ्याचं अनावरण झालेय. नवीन खेळाडूंना त्याच्याकडे पाहून प्रेरणा मिळण्याच्या उद्देशानं हा पुतळा उभारण्यात येत आहे. वानखेडेच्या ‘एमसीए’ लाउंजमध्ये हा सोहळा पार पडत आहे.. या कार्यक्रमाला बीसीसीआयचे सचिव जय शाह, बीसीसीआय कोषाध्यक्ष आशिष शेलार, एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे उपस्थित आहेत. सचिननं वानखे़डेवर मैदानावर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.










करिअरमधील शेवटची कसोटी इथेच -


2013 मध्ये सचिन तेंडुलकर याने  वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट करिअरमधील अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. वानखेडे मैदानावरच 2011 साली वन डे मधील दुसरा वर्ल्ड कप जिंकला होता. सचिनला त्यावेळी खेळाडूंनी खांद्यावर घेत संपूर्ण मैदानात फेरी मारली होती. सचिन तेंडुलकरने दोन दशाकांहून अधिक काळ क्रिकेटवर अधिराज्य गाजवले. त्याला क्रिकेटचा देव म्हणूनही ओळखले जाते. सचिन तेंडुलकरने वनडे आणि कसोटीमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करण्याचा पराक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने वनडेमध्ये 18 हजारांपेक्षा जास्त धावा काढल्यात. तर कसोटीत 15921 धावा नावावर आहेत.