Afghanistan Team World Cup 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक आहेत. प्रत्येक संघाने विश्वचषकाची कसून तयारी केली आहे. दोन दिवसांत सराव सामन्याला सुरुवात होईल. प्रत्येक संघाला दोन दोन सराव सामने खेळण्यास मिळणार आहेत. पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. दहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. भारताचा शेजारी अफगाणिस्तानचा संघ आज भारतात दाखल झाला. विश्वचषकात अफगाणिस्तानचा पहिला सामना सात ऑक्टोबर रोजी बांगलादेशसोबत होमार आहे. अफगाणिस्तान संघातील खेळाडूंनी भारताकडे रवाना होण्यापूर्वी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते. राशिद खान याच्यासोबत इतरही खेळाडू आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघाकडून खेळतात. त्यांना भारतीय खेळपट्टीचा दांडगा अनुभव आहे. 


अफगानिस्तान क्रिकेट बोर्डने टीम भारताकडे रवाना होण्यापूर्वी एक्सवर (ट्विटर) काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये राशिद खानसह इतर खेळाडू विजयासाठी प्रार्थना करत असताना दिसत आहेत. अफगाणिस्तानचा संघ भारतात दाखल झालाय.  मोहम्मद नबी आणि राशिद खान यांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. या दोघांनी अफगाणिस्तानसाठी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. 






अफगाणिस्तानसाठी युवा इब्राहिम जादरानची कामगिरीअत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा फारसा अनुभव नाही, पण देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. इब्राहिमने 19 वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात 911 धावा केल्यात. यामध्ये चार शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आङे. त्याशिवाय पाच कसोटी सामन्यात  362 धावा चोपल्या आहेत.  24 टी20 सामन्यात 500 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडलाय.






विश्वचषकात अफगाणिस्तानचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध आहे. दुसरा सामना भारताविरुद्ध  11 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. तर अखेरचा साखळी दहा नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका संघाविरोधात होणार आहे.


क्रिकेट विश्व कप 2023साठी अफगानिस्तान टीम :
 हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.