India vs Australia, 3rd ODI : भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप (World cup 2023) आधी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा (IND vs AUS) २-० ने पराभव केला आहे. तीन सामन्याच्या मालिकेतील अखेरचा सामना राजकोट (rajkot) येथे होणार आहे.  अखेरच्या वनडे सामन्यात भारताचे सर्व खेळाडू कमबॅक करत आहेत. विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मासह (Rohit Sharama) पाच जण परतणार आहेत. त्यामुळे प्लेईंग ११ मध्ये बदल निश्चित आहे. 


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यासाठी रोहित शर्माला आराम देण्यात आला होता. संघाची धुरा केएल राहुलने  संभाळली होती. राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघाने दोन्ही सामन्यात बाजी मारली. पहिल्या सामन्यात पाच विकेटने विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात  99 धावांनी मात दिली.  या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर टीम इंडियाला सर्वात मोठा दिलासा मिळाला तो म्हणजे सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरचा फॉर्म होय.


विश्वचषकाआधी प्रयोग करण्याची भारतीय संघाकडे अखेरची संधी असेल. त्यामुळे सलामी फलंदाज शुभमन गिल याला आराम दिला जाऊ शखतो. त्याजाही रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामीला येतील. त्याशिवाय सूर्यकुमार यादव यालाही आराम देण्याची शक्यता आहे. सूर्यकुमारच्या जागी विराट कोहली कमबॅक करेल.  


शार्दूल बाहेर, हार्दिक आत -


तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय संघात बदल निश्चित आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांचे कमबॅक झाले आहे. त्यामुळे संघात पाच बदल होण्याची शक्यता आहे. शार्दूल ठाकूरच्या जागी हार्दिक पांड्या संघात कमबॅक करेल. ऋतुराज गायकवाडच्या जागी रोहित शर्मा खेळेल. ईशान किशन आणि रोहित शर्मा सलामीला उतरतील. तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. श्रेयस अय्यर चौथ्या तर राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. सहाव्या स्थानावर हार्दिक तर सातव्या स्थानावर रविंद्र जाडेजाला स्थान दिले जाईल. कुलदीप यादव आठव्या स्थानावर असेल... जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज असे तीन फिरकी गोलंदाज असतील. सूर्यकुमार यादव आणि आर. अश्विन यांना आराम दिला जाऊ शकतो. 


तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाचे संभाव्या ११ शिलेदार


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.