लंडन : श्रीलंकेने यजमान इंग्लंडचा 20 धावांनी पराभव करून विश्वचषकात मोठी सनसनाटी निर्माण केली. या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडला विजयासाठी 233 धावांचं माफक लक्ष्य दिलं होतं. पण इंग्लंडला त्या छोट्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करता आला नाही.
श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा, धनंजय डिसिल्व्हा आणि इसुरु उडानानं इंग्लडचा अख्खा डाव 47 षटकांत 212 धावांत गुंडाळला. मलिंगानं चार, तर डिसिल्व्हानं तीन फलंदाजांना माघारी धाडलं. उडानानं दोन विकेट्स काढून त्यांना छान साथ दिली. इंग्लंडच्या बेन स्टोक्सनं नाबाद 82 आणि ज्यो रूटनं 57 धावांची झुंजार खेळी उभारली.
त्याआधी, श्रीलंकेनं या सामन्यात 50 षटकांत नऊ बाद 232 धावांची मजल मारली होती. अविष्का फर्नांडोनं 49 धावांची खेळी करून श्रीलंकेला केविलवाण्या स्थितीतून बाहेर काढलं. मग अँजलो मॅथ्यूज आणि कुशल मेंडिसनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 71 धावांच्या भागिदारीनं श्रीलंकेच्या डावाला आकार दिला.
मॅथ्यूजनं नाबाद 85 आणि मेंडिसनं 46 धावांची खेळी उभारली. मॅथ्यूजनं धनंजय डिसिल्व्हाच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी 57 धावांची आणखी एक भागीदारी केली. इंग्लंडकडून जॉफ्रा आर्चर आणि मार्क वूडने प्रत्येकी तीन, आदिल रशिदने दोन आणि ख्रिस वोक्सने एक विकेट घेतली.
World Cup 2019 | श्रीलंकेकडून इंग्लंडचा 20 धावांनी पराभव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jun 2019 05:05 AM (IST)
श्रीलंकेनं या सामन्यात 50 षटकांत नऊ बाद 232 धावांची मजल मारली होती. अँजलो मॅथ्यूज आणि कुशल मेंडिसनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 71 धावांच्या भागिदारीनं श्रीलंकेच्या डावाला आकार दिला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -