Women’s Premier League 2023 :  महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या हंगामातील दुसरा सामना आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये सुरु होत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB vs DC) या सामन्यात बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या T20 लीगचा पहिला सामना मुंबई संघाने गुजरात जायंट्सला मात देत जिंकला आहे. आता आजच्या सामन्या स्मृतीचा आरसीबी संघ जिंकणार की विश्वचषक विजेती कर्णधार मेग लॅनिंग बाजी मारणार हे पाहावे लागेल.






म्हणून निवडली असावी गोलंदाजी...


आजचा सामना मुंबईच्या ब्रेब्रॉन स्टेडियमवर खेळवला जात आहे. आतापर्यंत येथे 11 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 6 वेळा विजय मिळवला आहे. इथल्या खेळपट्टीवर पहिल्या फलंदाजीदरम्यानच्या सरासरी धावसंख्येबद्दल बोलायचं झालं तर ती 165 धावांच्या आसपास दिसते. सुरुवातीच्या काळात वेगवान गोलंदाजांना या विकेटची मदत मिळणं अपेक्षित असताना, छोट्या चौकारांमुळे फिरकी गोलंदाजांना अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ या सर्व गोष्टी लक्षात घेऊन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो., त्यामुळेच आरसीबीने प्रथम गोलंदाजी निवडली असावी. तर आजच्या सामन्यासाठीचे नेमके संघ पाहूया...


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ 


स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, हीदर नाइट, दिशा कासट, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, आशा शोबाना, प्रीती बोस, मेगन शुट, रेणुका ठाकूर सिंग.


दिल्ली कॅपिटल्सचा संघ


शेफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नॉरिस


लाईव्ह सामना कसा पाहाल?


दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महिला संघ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.


हे देखील वाचा-


WPL 2023 Schedule : महिला प्रीमियर लीग 2023 चं वेळापत्रक ते लाईव्ह स्ट्रीमिंग, A टू Z माहिती एका क्लिकवर