RCB vs DC, WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL)  पहिल्या सत्राची सुरुवात 4 मार्च रोजीपासून धमाकेदारपणे झाली. आता या मोसमातील दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात (RCB vs DC) आज 5 मार्चला मुंबईच्या ब्रेब्रॉन स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात, जिथे जागतिक क्रिकेटची दिग्गज महिला कर्णधार मेग लॅनिंग दिल्ली संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे, तर बंगळुरू संघाचे नेतृत्व स्मृती मानधना करणार आहे. मेग हिने नुकताच ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकवून दिला.


रॉयल चॅलेंजर्स महिला (RCB-W) संघाबद्दल सांगायचं तर, कर्णधार स्मृती मानधना व्यतिरिक्त, अॅलिसा पेरी, रेणुका सिंग, ऋचा घोष आणि मेगन शुट सारख्या उत्कृष्ट मॅच-विनर खेळाडू आहेत, जे स्वतःच्या खेळाच्या जोरावर सामना जिंकवून देऊ शकतात. दुसरीकडे, जर आपण दिल्ली कॅपिटल्स महिला (DC-W) संघाबद्दल बोललो तर, कर्णधार मेग लॅनिंग व्यतिरिक्त, त्यांच्याकडे शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्सच्या रूपात उत्कृष्ट खेळाडू आहेत.


पिच रिपोर्ट


दिल्ली कॅपिटल्स महिला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघ यांच्यातील हा सामना मुंबईच्या ब्रेब्रॉन स्टेडियमवर खेळवला जाईल. आतापर्यंत येथे 11 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 6 वेळा विजय मिळवला आहे. इथल्या खेळपट्टीवर पहिल्या फलंदाजीदरम्यानच्या सरासरी धावसंख्येबद्दल बोलायचं झालं तर ती 165 धावांच्या आसपास दिसते. सुरुवातीच्या काळात वेगवान गोलंदाजांना या विकेटची मदत मिळणं अपेक्षित असताना, छोट्या चौकारांमुळे फिरकी गोलंदाजांना अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ या सर्व गोष्टी लक्षात घेऊन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.


संभाव्य प्लेइंग इलेव्हन


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघ - स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, हीदर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), दिशा कासट, श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, पूनम खेमर, मेगन शुट, रेणुका सिंग.


दिल्ली कॅपिटल्स महिला संघ - शेफाली वर्मा, अॅलिस कॅप्सी, जेमिमा रॉड्रिग्ज, मेग लॅनिंग (कर्णधार), मारिजाने कॅप, लॉरा हॅरिस, तानिया भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, पूनम यादव.


मॅच प्रेडिक्शन


हा दुसरा सामना आहे ज्यामध्ये बंगळुरू आणि दिल्ली या दोन्ही संघांमध्ये एक उत्कृष्ट सामना होण्याची शक्यता आहे कारण दोन्ही संघामध्ये उत्कृष्ट खेळाडू आहेत. अशा स्थितीत सामना रोमहर्षक होण्याची अपेक्षा केली जाऊ शकते, स्मृती मानधनाच्या संघाचं पारडं थोडं जड दिसत असलं तरी कर्णधारपदाच्या दांडग्या अनुभवावर मेग लॅनिंगचा संघही दमदार स्थितीत अनुभव दिल्ली संघासाठी खूप  आहे.


हे देखील वाचा-