Team India Champions Trophy Final 2025 : टीम इंडियाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम सामना 9 मार्च रोजी आहे आणि तो सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरही खेळला जाईल. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सर्व सामने दुबईमध्ये खेळले आहेत. अशा परिस्थितीत, उपांत्य फेरीतील विजयानंतर पत्रकार परिषदेत गौतम गंभीरला यासंबंधी एक प्रश्न विचारण्यात आला. आणि तो प्रश्न असा होता की, टीम इंडियाला या ठिकाणी खेळण्याचा फायदा मिळत आहे का? दुबईच्या खेळपट्टीचा आणि परिस्थितीचा फायदा झाला का? आणि हेच कारण आहे का इतके फिरकी गोलंदाज घेऊन खेळला? या प्रश्नांची उत्तरे देताना गंभीर स्पर्धेत सतत अशा गोष्टी बोलणाऱ्यांवर संतापला.


कोच गौतम गंभीर संतापला, कोणावर भडकला?


पत्रकार परिषदेत प्रश्नांची उत्तरे देताना गौतम गंभीर म्हणाले की, दुबईचे ठिकाण आमच्यासाठी जितके तटस्थ आहे तितकेच ते इतर संघांसाठीही आहे. दुबईमध्ये खेळून आम्हाला बराच काळ झाला आहे. गेल्या वेळी आपण इथे कोणता सामना खेळलो होतो हे मला माहित नाही. आम्ही अशी कोणतीही योजना घेऊन आलो नव्हतो की, आम्हाला येथे फिरकी घेऊन मैदानात उतरायचं आहे. आम्ही पाकिस्तानमध्ये खेळलो असतो तरी 15 जणांच्या संघात 2 आघाडीच्या फिरकीपटूंची निवड केली असती. कारण, भारतीय उपखंडात खेळपट्टीची भूमिका महत्त्वाची आहे.


गंभीर एवढ्यावरच थांबला नाही. त्यानंतर त्याने त्या सर्व टीकाकारांनाही फटकारले जे म्हणत होते की भारताला सुरुवातीला फायदा झाला. गंभीर म्हणाला की, आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये एकही दिवस सराव केला नाही. आम्ही सरावासाठी आयसीसी क्रिकेट अकादमीमध्येही जातो, जिथे परिस्थिती इथल्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. दोन्ही खेळपट्टीमध्ये खूप फरक आहे. तो म्हणाला की, काही लोकांना रडण्याची सवय असते.  
भारताने स्पर्धेतील चारही सामने जिंकले.


भारताने दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपले सर्व सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात त्याने बांगलादेशला हरवले. मग पाकिस्तानचा पराभव केला. आणि तिसऱ्या गट सामन्यात न्यूझीलंड संघाला पाणी पाजले. त्यानंतर त्यांनी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुबईमध्ये जिंकलेल्या स्पर्धेतील सर्व 4 सामन्यांपैकी भारताने 1 सामना प्रथम फलंदाजी करताना जिंकला तर उर्वरित 3 सामने धावांचा पाठलाग करताना जिंकले.


हे ही वाचा -


Shoaib Akhtar on Team India : भारत आता त्या दोघांना अजिबात सोडणार नाही; ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर काय म्हणाला?